Selections from the Peshwa Daftar 2.102: [4-6-1759] Govindpant's overtures to Najibkhan and Vazier Gajiuddin.
Selections from the Peshwa Daftar 2.102
- Language
- Marathi
2.102
पौ। ८ सव्वाल
पु॥ श्रीमंत राजश्री पंत प्रधान
स्वामीचे सो.
विनंती. राजश्री गोविंद बलाल अंतरवेदीहून सरदाराकडे यावे याजकरिता सिकंदऱ्यासमीप येऊन पावले. तेथे नजिबखानाचा अमल होता त्यास उठऊन देऊन त्या प्रांती अमल करून तेथील बंदोबस्त केला. हे वर्तमान ऐकून नजिबखानाने मिरापुराहून कूच करून, गुलावटी म्हणोन हापडेजवळ जागा आहे तेथे येऊन पावला. रा। गोविंदपंतहि हापडेजवळ पावले. उभैतामध्यें पांच साहा कोसाचा अंतराय राहिला. राजश्री अंताजीपंतानी सरदारासी बहूत बाजिदी केली की, या माहालावरी श्रीमंताचे ऐवजाचा तनखा आहे तेथे गोविंदपंतानी हंगामा केलिया नजिबखां पैका कैसा देईल? त्यास साफ मनाईची चिठी पाठऊन देणे की नजिबखानाच्या परगण्यांत खलखल न करीत, त्यासी रस राखून, फितूर न करिता तुम्हाकडे येत. त्यास अंताजीपंतांची भीड जरूर जाणून गोविंदपंतास वरचेवरी पत्रे पाठविली. त्याकरितां नजिबखानासी सख्य केला. त्याजकडून सुजानराऊ म्हणोन ग्रहस्त व मेघराज वकील पंतमजकुराजवळ आले. काही दाणाघासास देऊ करून उभैतासी सख्यत्व करून दिधले. वजीरानी गोविंदपंतास आणावयासी आम्हाकडील कारकून बालाजीपंत म्हणोन ग्रहस्त होता त्यास पाठविले. त्यांनी जाऊन गोविंदपंतास नीट दिल्लीस आणिले. छ २२ शाबानी राजघाटावरी आले. छ २३ रोज रविवारी जलालुद्दीखां व दलेलसिंग व मेहदीकुलीखां पार जाऊन त्यास घेऊन आले. नवाब वजिराची भेट घेतली. येक घटिका खासा नवाब सिवगोविंदपंतासी खिलवत जाली. पंतमजकुरास सा पार्चांचा खिलत व जवाहर दोन रकमी व येक घोडा व तिघा पुत्रास खिलत जवाहर व खिलत समागमचे लोकास दिधले. गरमबोसी करून डेन्यास गेले. मागती येक भेट अणखी होणार आहे. पुढे जे ठरेल ते सी विनंती लिहूं. कृपा केली पाहिजे हे विज्ञाति.
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English