Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.103: [1759] This is an important document of which the first sheet is not forthcoming. It seems to be addressed to the Peshwa at a critical juncture in the situation at Delhi when Shahajada Ali Gouhar had taken flight to Patna and put himself under the protection of the British. The distracted condition of Delh

Selections from the Peshwa Daftar 2.103

Language
Marathi

2.103

(पहिला बंद गहाळ)

ष्टीसहि याकूबआलीखानाने जाबसाल साफ दिल्हा की, शाहाने खिलत दिल्हा होता तो तुम्हास दिल्हा; आणि बगैर्हुकूमसिवाये आमच्याने होत नाही. तुम्ही आपल्या जोराने जैसे करेल तैसे करणे. आजपावतो सर्व मथुरेस आहेत. मर्जी अवघ्याची आहे की नजीबखानास मधून दरमियान उठऊन बदस्तूर साबीक गाजुदीखास करावे. आवघा येख्तीयार सलतनतचा ठाकूर सुरजमल याचा होये जैसी मर्जी सर्वाची व ठाकराची आहे. बाकी मजकूर आहे की आयुधेकराकडून व पटिणाकडून व रोहिल्याकडून प्रांत सरकारचा सोडऊन ठाकरानी पडद्यांत आपण घ्यावे हे मर्जी ठाकराची आहे. यास्तव आयुध्येकराचे व रोहित्याचे वकिलानी साफ जाब दिल्हा की जाठाचे तालूक करून आम्हाकडून सोडवायाचे कराल तर सोडणार नाही. याप्रा त्यांनी उतर दिल्हे व खातरदास्त ठाकराचे आपले खाविंदास लिहितो म्हणोन सांगितले व बोलतात. वजिराने व ठाकराने आपले रफ़ीक करावयासी हाफीजरहमत व डुंदेखा व सादुलाखां यासी लि॥ आहे. टेकचंद वकील हाफीजाचा आला होता. त्यास आपले रफ़ीक करावयासी हाफिजापासी पा॥ आहे. परंतु हाफीज वगैरे गोष्ट खुलून करणार नाहीतसे दिसते. व नजीबखां सोनपतावर आहे. जाठ वजिराचे मानस पातशाह दुसरा करावा. यास्तव आलीगौहरचे मायेने रोहित्यास लाऊन घेतले आहे. यास्तव दिसता प्रकार जैसा दिसतो कीं, फिरून खलसाची जड कायेम होते. शाहवलीखां खुद सर्व गोष्टीचा येख्तीयार स्वामीच्या करून गेला आहे. याकूबआलीखां स्वामीपासी पोहचल्यावर बाद सलुकाचे वजे स्वामी करतील ते प्रमाण आहे. स्वामीचे सो॥ श्रुत व्हावे यास्तव मजकूर सो॥ विनंती केली आहे. आतां बोलावणे याकूबअलीखानाचे, येख्तीयार स्वामीचा आहे. जर बोलावणे सलाह असेल तर कृपापत्रे सन्माने तसल्लीची याकूबअलीखानाचे नावांची पाठवावी व समाधान मित्रत्वाची पत्रे गाजुद्दीखानास व ठाकरास व राजे नागरमल व दरेलसिंग व जलादुद्दौले व नवाब मजदुद्दौले आबदूल हयादखानास इनायेतें होत. याकुबअलीखानास हजूर बोलावून सर्वा गोष्टीचा सफा करून शाहासी येकोपा पका करून मग तेथून बसून हिंदुस्थानचा बदोबस्त जैसा करणे तैसा करणार स्वामी समर्थ आहेत. बंगालियाचा सुभेदाराची खबर आली की बंगालेवाल्याने व फिरंगियाने आलीगौहरास किल्ले पटणियात ठेविले आहे. हे खबर कितेक दिवस येतच आहे. या दिवसात नाजमसी व आलिगौहरासी सल्लूक जाला आहे आणि आलीगौहरानें कूचहि हिंदुस्थानाकडे केले. फिरंगी सांगाते आहेत. इकडे येतो यास्तव पूर्वी विनंती लिहिली आहे. त्याप्रा॥ अर्जदास्त जरूर पाठविणार स्वामी समर्थ आहेत. हाली लाहोराहून शाहाचे चपल दोघे याकूब-आलीखानास तालीकें कच्चा घेऊन आले की तुम्ही लौकर श्रीमंत स्वामीपासी जाऊन सर्वा गोष्टीचा सल्लूक करून येणे. त्यास नवाब याकूबअलीखानास घेऊन आम्ही सो॥ दर्शनलाभ घेयासी येतो. मागाहून वृत होईल ते सो॥ विनंती लिहू. कृपा केली पाहिजे हे विज्ञप्ति.

[१ पार्चा-वस्त्र, पोशाख. सा पार्चाचा खिलत-सहा वस्त्रांचा पोशाख.]

[२ बदस्तूर साबीक=पूर्वील वहिवाटीप्रमाणे. ३ स्नेही. ४ तंट्याचें बीज.]