Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.104: [6-8-1759] An important letter of Dattaji Scindia to the Peshwa describing how faithfully he was acting up to the instructions he had received from the latter.

Selections from the Peshwa Daftar 2.104

Language
Marathi

2.104

No. 104]

श्री.

छ १२ जिलकाद सनसितैन.

सेवेसी विज्ञप्ति. आज्ञापत्र छ २४ रजबचे पाठविलें ते छ २९ साबानी पावलें. तेथें आज्ञा, वजिराचाँ महद् अन्याये जाला; तरी त्याचे पारपत्य करावें. क्षुल्लक गोष्टीसाठीं चितावर न घेणें. नजीबखानानी श्रीमंत राजश्री दादासाहेबासी दिल्लीस असतां त्यानी यथास्थित वर्तणुक केली नाहीं. त्याचे पारपत्य करावें आण पुर्वेस जावयाचा विचार करून बंगाल्यास जाऊन मातबर पैका मेळऊन कर्ज वारावयाची तजवीज करणें, वजीरास समागमे घेऊन बंगाल्याचे काम करून घेणे. त्याच्या जाण्याचे प्रकार फार आहेत व पेच फार आहेत म्हणोन त्याचे येणे न जाहले तरी सुज्यातदौल्यासच हाती धरून पूर्वेची कामें करून घेणे म्हणोन आज्ञा.

[१ खातरजमेचीं.]

[२ पाठवून देणें.]

[३ कच्चे मसुदे.]

आज्ञापत्र पावतांच शतद्रु नदीहून कूच केले. पूर्वेस जावयाचा मनसबा केला असें दिल्लीस गेल्यावर वजिरास समागमे आलातरी घेऊन जात आहों. त्यांनी आमचे मुद्दे मान्य केले तरी बराबर नेऊ.

१. प्रयागचा किला द्यावा.

१. श्रीची सनद द्यावी.

१. पटण सरकारांत द्यावें.

१. द्रव्य मिळेल ते दररुपयास.

०|= साहाआणे वजीरानी घ्यावें दाहाआणे आम्ही घ्यावें

यैन वाटा चौथाई वा

०||• ४=

येणेप्रमाणे आमचे मुद्दे त्यानी कबूल करून सनदापत्रा करून दिल्या तर त्यास घेऊन जात आहो. समागमे न ये दिल्लीस राहून स्वामीच्या कार्यास कांही कुविद्या करू लागला तर पूर्वेस गेल्यावर सुज्यातदोल्यासच हाती धरून पूर्वेकडील काम जैस दृष्टीस पडल तैसाच मनसबा करून स्वामी कार्य केले जाईल. छावणी पूर्वेस करावयाचा विचार केला असे. प्रजन्य काळीच बंगाल्याचे काम केले जाईल. स्वामीचे पुण्यप्रतापे करून सर्व उत्तम होऊन येईल.

नजीबखान याचा वकील येथे येऊन करार करून गेला आहे कीं फौज सुधां बराबर पूर्वेस यावें याप्रमाणे करार केला आहे. फौज सुधां समागमे येऊन यथास्थित वर्तणूक करू लागला. गेला तर उतम जाले. बराबर न ये तरी त्याचे पारपत्य केले जाईल. येमुना उतरते समयी येऊन केल्या कराराप्रमाणे फौजसुधा आला तर उतम जाले. न ये तरी आज्ञेप्रमाणे त्याचे पारपत्य करून तेथील बंदोबस्त करून पूर्वेस जाऊं. याचे कामास गुंतावे तरी दिवसगत लागेल. थोरल्या कामास अंतर पडल. गंगापार जावयास अवकाश थोडका यास्तव त्याची समजावीस काढून बराबर न्यावयाची तजवीज काढली असे १

अंतरवेदीतून जातां मुलकाची रखवाली करून गंगेस पूल बांधोन सुज्यातदौल्याच्या मुलकांत जातो. तेथील जमीदार व भूमे हाती घेऊन जैसे दृष्टीस पडेल तैसा बदोबस्त केला जाईल.

सुज्यातदोला यांनी शहाजाद्यास दोन लाख रुपये देऊन बराबर आपली फौज देऊन मिरजाकोचलास (?) देखील दिल्हे असेत. पटण्यास गेले. पटणवाल्याची याची कटकट जाली. शहाजाद्याचे ठिकाण लागले नाहीं. दुसर मागल करारपैकीं त्याजकडे बाकी येणे आहे. काशीची सनद जाली असतां अमल दिल्हा नाहीं. ऐसे निमित्य त्याजकडे आहे. हरएक निमित्य त्याजवर येऊन स्वामीकार्य करून घेतले जाईल.

कर्ज वारावयाची चिंता असो द्यावी म्हणून आज्ञा केली तरी कर्जाची चिंता आम्हास आहे. पूर्वेस गेल्यावर * * मनसब्यामध्ये द्रव्यविशेष मिलल, अण कर्जवारे तेच केले जाईल. स्वामीस कर्ज जाले आहे त्याची काळजी रात्रंदिवस लागली असे. कायाकस्टे करून मिलल ते सेवेसी पाठऊन देऊ.

० लग.

सेवेसी श्रुत होय हे विज्ञाप्ति.

Discussed in (1)