Selections from the Peshwa Daftar 2.105: [1759] Vithal Shivdeo complains against Antaji Mankeshwar to Bhausaheb. He was later severely punished at the end of 1759.
Selections from the Peshwa Daftar 2.105
- Language
- Marathi
2.105
श्री.
श्रीमंत राजश्री भाऊसाहेब
स्वामीचे सेवेसी.
विनंती सेवक विठल सिवदेव कृतानेक सा। नमस्कार विज्ञापना. येथील वर्तमान ता॥ छ १७ माहे जिल्हज मु॥ इंद्रप्रस्थ येथे स्वामीचे कृपावलोकने करून वृत्त यथास्थित असे विशेष. राणोजी देवकर यानी लबाडी करून पागा दरोबस्त टाकून घोडी रानात सोडून राजश्री अंताजीपुत्राच्या समागमे देशास आले आहेत. बोलीचालचे अनुसंधान त्याजकडे लाविले आहे. याखेरीज सिलेदार व बारगीर फिताऊन नेलेच आहेत. त्याच्या थोरपणाची रीत सेवेसी ल्याहावी येसे नाहीं. राजश्री अंताजीपंताचा व आमचा करार कीं त्याजकडील सिलेदार व बारगीर आम्ही ठेऊ नयेत. व आम्हाकडील त्यानी ठेऊ नयेत येसे असतां ते अपल्या कर्तृत्वास चुकत नाहीत. बरे थोरच अहेत. येसियासी राणोजी देवकराची माणसे पुरी आहेत. तेथे स्वामीनी हुजरे पाठऊन त्याची मुलें माणसें कैद करून विंचुरास पाठवावयाची आज्ञा करावी. तेसे अलीमहात व नुरखान हे आम्हापासीं बहुत दिवस होते. ते चाकरी टाकून राजश्री अंताजीपंताच्या पुत्रासमागमे देशास आले आहेत. त्यांजकडे दोन हजार रुपयेपर्यंत फाजील आहे. त्याचे घर मौजे राशींमधे आहे. तेथे स्वामीनी चौकी बसऊन त्याची मुले माणसे विंचुरास पाठवावी. स्वामीनी याप्रा॥ शिक्षा केलिया धास्त बेगोन दुसरा कोणी बदफैल करणार नाही. * महातानी दरोबस्त कारखाना टाकून अंताजीपंतीं फिताऊन नेले. कारखाना सरकारचा. माहातानी बदमामली करावी येसे नाही. त्यांस शासन जाल्याखेरीज सरदारात कैद राहात नाही. तूर्त त्यास अंताजीपंताचे पुत्र लपऊन ठेवितील. त्याची रांडापोर राशात आहेत. ते कैद करावयाची आज्ञा करावी. राणोजी देवकर लबाड. पागा राणात सोडून बेकैदी करून गेला. त्याचे घरी चौकी बसऊन त्याचे पारपत्य करणार स्वामी समर्थ आहेत. देसच्या माहालचा येवज कर्जास तरी नेमून देणार स्वामि समर्थ असेत. चांदवडच्या किरकोळ खेडीयाचा येवज दरोबस्तचा ठेवीदेखील आद्यात ल्याहावा, येसे यादीवार करार आहे. त्याप्रों तेथील येवज चाकरी सुधा पंधरा हजार होईल. त्यात टांक [सा] लीस दोन हजार तोटा आहे. आद्यात च्यार हजार तनख्या प्रों धरले. आकार दोन हजार केला आहे. ये गोष्टीची चौकसी पाहून तोटा मजरा देऊन बाकीचा येवज आद्यात धरवावा. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.
[१ हा मिर्झाकोचला कोण?]