Selections from the Peshwa Daftar 2.106: [11-11-1759] Abdali's messengers came to Delhi with dispatches for Najibkhan, Madhosingh and others.
Selections from the Peshwa Daftar 2.106
- Language
- Marathi
2.106
छ २५ रबिलाकर
पु॥ श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी.
विज्ञाप्ति ऐसीजे. अब्दालीचे चपैर काबुलेहून छ २० रोवली दिलीस पोहचले. तालीकचे व रकम याकुब अलीखानास व नजीबखानास व राजे माधोसिंग व राजे बिजेसिंग वगैरी यास आले आहेत की आम्ही फौज जमा करून हिंदुस्थानास यावयाची तयारी केली. येऊन पोहचतो. तुम्ही साफ लिहिणे कीं पातशाहाची अतायेतमध्ये रोहिल्यांत व राज्यात कोण कोण आहे? श्रीमंताच्या घराची काय हकीकत अहे? शाहअलम व शुज्यातदौले कोणे फिकिरींत आहेत? वजीर व सुरजमल काय करितात? ठाकूर सुरजमल व नजीबखानाचे काये जाले. मुफसल लिहिणे. ज्याहनरुवा सरदार पुढें रुखसत केला आहे, तो सत्वरच येऊन लाहोर दाखल होईल. याप्रो तोंलिकच्या याकूब अलीखानास अला आहे. व नजीबखानास लिहिले आहे कीं हिंदुस्थानचे सलतनतचा नजराणा वाजबी आहे, तो सालबसाल पोहचावणे येविशयीं उजूर करील त्यासी समजून घेऊ. या प्रो सर्वांस लिहिलें आहे. श्रुत होये कृपा केली पाहिजे. हे विज्ञाति.
[१ रासें--जि. नगर. २ चपराशी, दूत. * अक्षर भिन्न.]