Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.107: [10-12-1759] Raja Keshav Rao writes to the Peshwa the arrival of Abdali's forces against Dattaji and Jankoji Scindias.

Selections from the Peshwa Daftar 2.107

Language
Marathi

2.107

श्रीकृष्णोजयेती.

पौ छ १६ माहे जमादिलावल

सन सितैन पौश मास

मुकाम नगर

श्रीमंत माहाराज राजश्री पंडित प्रधान

बालाजीराव नाना स्वामीचे सेवेसी.

पो राजा केशवराव सां नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल ता छ १९ रालाखर झासीत जाणून स्वकुशललेखनाज्ञा केली पाहिजे विशेष. दिल्लींत वजिराने आलमगीर पातशाहास छ ८ रोज माहे रालाखरी मारून दुसरा पातशाह कामबक्षाचा नातू किकियात कैदेत होता त्यास काढोन तख्ती बसविले. आपण दिल्लीहून कुशलरूप कूच करून सिंदीयाचे लस्करात गेलो. मागे हे काम करविले. हे करावयास मूल, अबदाली लाहोराकडून दिलीकडे येणार व फौजा त्याच्या सिरहिंद पावेतो आल्या, हे जाणून, पातशाहाचे त्याचे सूत्र येक जाणून, वजिराने हे काम केले. व खानखाना वजिराचा सखा मामा पूर्वी वजीर होता त्यास वजिराने कैद करून घरदार लुटले होते त्यासहि जिवे मारून टाकिले. मूल आलमगीर पातशाह जो दिलीत होता त्याचे जागा दुसरा पातशाह जाला. व अलमागिराचे कबिलियांत लोक पाठऊन त्या सर्वास लुटले व बाहीर काढले. आतां अबदाली दिलीस अंगर रोहिल्याचे कुमकेस जातो हे पाहावे. रोहिले व शुजाउदौला येक होऊन सिंदीयाचे मुकाबिलीयावरी आहेत. अबदालीहि त्यात मिळाला तरी तिघे येक होतील. त्या तिघासी सिंदे मुकाविला घेतील. इतकियांत राजश्री मल्हारराव होल[कर] सुभेदार प्रस्तुत माधवसिगासी त्यासी प्रसंग आहे. झुंजहि मोठे जाले. इकडील काम उरकोन सिद्याकडे जाऊन कुमकेस पावायास तफावत फार आहे. माहाराजाचा प्रताप सर्वास सहाय आहे. विशेष काये लिहावे. माहाराजास वर्तमान चहूकडून पावतच आहे. आम्ह्रीहि वरचावरी विनंती पत्रें आज्ञेप्रमाणे पाठवीतच आहो. विदित होये व आज्ञेप्रमाणे सिंदे सरदारासहि वरचे वरी लिहावयाचे लिहितों. विदित होये हे विनंति.

[१ तालिकचा—आज्ञापत्र.]

## 107a

@D [30-4-1757

श्री.

नकल

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री केशवरावस्वामी गोसावी यासी.

पोो बालाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे विशेष. पत्र पाठविले ते प्रविष्ट जाहाले. अवदालीचा मजकूर व कर्तव्यमनसुबा याचा अर्थ विस्तारे लिहीला तो कळला. येशास चिरंजीव राा. दादा व राा मल्हारजी होळकर त्या प्रांते आहेत. उचित मनसबा त्यासही लिहीत जाणे आणि आम्हास तिकडील वर्तमान वरच्यावर लिहीत जाणे छ ११ साबान बहुत काये लिहीणे हे विनती.