Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.109: [21-12-1759] News-letter giving Dattaji Scindia's preparations to meet the onslaught of Abdali's forces, showing that Dattaji did not enter rashly into the conflict.

Selections from the Peshwa Daftar 2.109

Language
Marathi

2.109

श्री.

छ ४ जमादिलाखर

माघ सीतैन

पुरवणी श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी विज्ञापना येसिजे. राजश्री जनकोजी शिंदे व राा दत्ताजी सिंदे नवाब वजिरुल्ममालिक बाहादुर यांसहित शुकुरतालाहून निघाले. ते दरकूच * छ २७ रविलाखरी कुंजपुऱ्यापासी यमुना उतरलें. तेथें बातमी ठीक आली कीं तैमुरशाह अब्दाली जाहानखानासहित व शाहवलीखान व समंदखां वगैरे सर्व सरदारासहित चालसापंन्नासा हजारा फौजेनसी मौजे कलडु व बनोरा व छत येथें येऊन छ २४ माहे मजकुरी शनिवारी दाखल जाला. अंबाल्यापर्यंत हरोलाची फौज उतरली आहे. अंबाला सिरहिंदीहून अलाकडे वीस कोस व कुंजपुऱ्याहून चालीस कोस आहे. डावे उजवे बाजूने व अगाडीकडे फौज ताराज करीतात व दाहादाहा वीस वीस कोस राण सोडवीत जातात. यैसी ठीक बातमी आल्यावर राजश्री दत्ताजी सिंदे यानी दोन फौजा केल्या. येक फौज तो भैंल घोडिये नामी नामी सरदार व कामाची माणसे भरोशाचे लोक जैरारी, पाल पडतल तंबू कनात बराबर नसे येसे निवडून पंचवीस तीस हजार आपल्या बाा घेतली व राा जनकोजी सिंदे याजला बाकीची फौज व तोपखाना घेऊन व नवाब वजीरूल्ममालिक यांस त्यांचे फौज व तोफखान्यासहित आपल्यापासून बारा पंधरा कोसाचे अंतरें मागे पुस्तगर्मीवर ठिवले. व याजमागें आपली व नवाबाची बहीर ठिवली कीं बहीरेचेहि संरक्षण होय व काम पडल्यावर आपलेहि कुमकेस पोहचते. कदाचित अब्दाली कावा करून डावे उजवे येखादी फौज घाबरे करायासाठी बहीरेवर पाठवितील तर हे उभयेता पारपत्य करीत. येसी तजवीज व नेमणुक करून छ ३० राखरी शुक्रवाररी आपण जरारी फौजेनसीं अब्दालीच्या मुकाबल्यावर गेले व राा जनकोजी सिंदे व नवाब वजीर बहीरसहित कूच करून करनालेकडे आले. अब्दालीचे अगाडीचे लोकासी व रोा दत्ताजी सिंदे यांच्या आगाडीचे लोकासी नजरनजर चोटफेटैहि जाली. जुजास प्रारंभ जाला. उद्या परवा खासा दत्ताजी पाटील ह्यांच्या मुकाबल्यावर जाऊन त्याचा घावदाव व जुंजाची तरतूद पाहून बळाबळ तोळून जुंजात जलदी करीतात किंवा धीमेपणे जुंजतात या सर्व गोष्टी व तऱ्हे व त्यांची इंगितें पाहून तदनुरुप आपणही जुंजाची कर्तुद करणार. मागाहून जसजसे वर्तमान होईल तसतसें विनंती करीत जाऊं. बहुत काय लिहिणे. कृपा केली पाहिजे हे विनंती.

[* १८-१२-१७५९.]

[१ शिलेदारांचीं घोडीं.]

[२ संडे.]

[३ हातघाई झीटपीट.]

Discussed in (1)