Selections from the Peshwa Daftar 2.110: [27-12-1759] May this letter refer to Jeta Gujar mentioned in Bhausaheb's bakhar? If so, some more light is necessary.
Selections from the Peshwa Daftar 2.110
- Language
- Marathi
2.110
श्री.
पौ छ ६ जमादिलावल साईंकाल
+ सेवेसी विज्ञाति. येथील कुशल ता छ ६ जमादिलावल मु॥ भांडेर दोन प्रहर दिवस यथास्थित असे विशेष. फौजेचा मोहरा येथून जुडला आहे. आपल्या सामानाहून त्याचे सामान भारी आहे. दुसरे काळी गुजरहि जाऊन सामील आले आहेत. त्याची आमची लढाई जुडली आहे. दुसरें शाहरास बहीरकोंटा नाहीं. गाव आफाट. यैश्यास मोर्चेबंदी केली पाहिजे. यास्तव बेलदार शंभर पाठविले पाहिजेत. सदरहु संभर बेलदार जरूर पाठविणें. जाटाकडील फौजेचे कुच होऊन मौजे बारेच येथें मुकाम होणार आहे. त्याचें आमचें कोसाचें अंतर. मोहरा जुडला आहे. यैसियासी बुधासिंग व हरीसिंग आले असतील. त्याची बिदा पत्र पोचतां करावी. लढाईचा वखत आहे. त्यास दारुगोली आधी पाठविली पाहिजे. दारुगोळीस ढील न होय. दारुगोली सत्वर पाठवावी. बहुत काय लिहिणे हे विनंती.
राजश्री आपास्वामीस व समस्तमंडलीस सां। नमस्कार लिा परिसोन लोभ कीजे हे विनंती.