Selections from the Peshwa Daftar 2.111: [28-12-1759] Dattaji's letter to the Peshwa showing how anxious he was to carry out the Peshwa's instructions to march into Bengal with Suja-ud-daula and take charge of the holy places of the Hindus.
Selections from the Peshwa Daftar 2.111
- Language
- Marathi
2.111
श्री.
छ २२ जमादिलाखर सु॥ सीतैन
श्रीमंत राजश्री......पंतप्रधान स्वामींचे सेवेसी.
विनंती सेवक दत्ताजी सिंदे कृतानेक दंडवत विज्ञापना. सेवकाचे वर्तमान ता॥ छ ७ जोवल मो कुजपुरा परयेत स्वामीचे कृपावलोकनेकरून यथास्थित असें विशेष. सरकारची आज्ञापत्रे छ + सफरची पाठविली ती छ ९ रोखरी सादर जाली. तेथें आज्ञा कितेक मनसब्याचा अर्थ वजिराचे स्नेहाचे वर्तमान व सुज्याउद्दौला याजपासून माहाक्षेत्रे घ्यावयाचा अर्थ व रोहिले यांचा मजकूर व पुर्वेकडे जावयाचा मनसबा वगैरे कितेक तपसिले आज्ञापिले ते कळले. ऐसियास येतद्विशईंचा अर्थ अलाहिदा पुरवणीपत्री तपसीलवार सेवेसी विनंती लिहिली असें त्यावरून विदीत होईल. सेवेसी श्रुत होये हे विज्ञाप्ति१.
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English