Selections from the Peshwa Daftar 2.112: [3-1-1760]
Selections from the Peshwa Daftar 2.112
- Language
- Marathi
2.112
श्री.
पौ छ १३ जमादिलाकर
शेवेसी विज्ञापना आज छ १३ जमादिलावली दिलीहून बातमीची पत्रे आली की राजश्री दत्ताजी सिंदे कुजपुरियाहून सडे होऊन पुढे गिलज्याचे तोंडावर गेले. राजश्री जनकोजी सिंदे व राजश्री गोविंदपंत व वजीर येसे बुणगियांत तेथेच राहिलेलेहेत. दत्ताजी सिंदे यांसी व गिलज्याची फौजसी घाट पडली. च्यार साह घटका परस्परे युद्ध प्रसंग जाले. उपरांतिक उभयेता आपालाले ठिकाणी कायम राहून मुकाम केले. तो तेच दिवशी गिलज्या रात्रीं कूच करून बुढियापासी येमुना उतरोन आंतरवेदीत गेले. पुढे नजीबखान हे येकत्र होणार. शेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English