Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.113: [1-1-1760] Malharrao Holkar to Dattaji Scindia, proposing to proceed immediately to meet the latter.

Selections from the Peshwa Daftar 2.113

Language
Marathi

2.113

( वरील भाग गहाळ )

फौज वीस हजार ज्याहनखान व संमदखान वगैरे सरदार शतद्रु नदी उतरोन आलीकडे आली. याजकरितां आम्ही नजीबखानांचा शह सोडून कुजपुरियापासी येमुना उतरोन वर आलो, तॊ आपणहि तिकडील कामे टाकून इकडे सत्वर यावे म्हणून लिहिले. त्यावरून आम्ही उचित मनसबा जाणून तोफखाना माघारा लाविला. इकडील कामे मागे पुढे करावयासी कार्यास येतील. मागे दुसाल नुकसानी जाली. पुढे येकसाल होईल ते पुरवली; व स्वामीचीहि आज्ञा की तिकडील इकडील विचार पाहून मनसबा कर्तव्य तो करावा. म्हणून. त्यास काल छ ११ जमादिलावलीं कूच केले. आथःपर या प्रांतीं कोठे येकक्षण न गुंतता मोठाsubत्या मजली करून गिलज्याचे पारपत्यासी जात आसो. होईल वर्तमान ते वरचेवर विनंतीपत्रे सेवेसी लिहीली जातील. तिकडील वृत्त सर्वदा लेखन करावयांसी आज्ञा करावी. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

[१ ह्याच मजकुराचें जनकोजीचेंहि पेशव्यास एक पत्र आहे.]

Discussed in (1)