Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.114: [15-1-1760] Hingne to Mahipatrao Chitnis. Writes details of Dattaji Scindia's fight and death at the battle of Delhi. This appears to be Ramaji Anant Dabholkar's (?) letter to the Peshwa giving vivid details of the situation of the Scindia's forces when Abdali advanced against him.

Selections from the Peshwa Daftar 2.114

Language
Marathi

2.114

श्रीवरद.

राजश्रियाविराजित राजमान्य राा महिपतराऊ दाजी स्वामी गो. स्ने॥ पुरुषोतम माहादेव कृतानेक असीर्वाद विनती उपर. येथील क्षेम ताा २५ जमादिलावल मुा कोटपुतली लस्कर राा जनकोजी सिंदे व राा मल्हारजी होळकर जाणून स्वक्षेम लिहणे विशेष. इकडील सविस्तर व्रत श्रीमंत स्वामींचे सोा लि॥ आहे त्यावरवून विदित होईल. तात्पर्यार्थ हाच कीं दिलीजवळ अबदाली व रोहिल्यासी झुंज झाले. राा दत्ताजी सिंदे ठार पडले. जनकोजी सिंदे यासि दंड फोडून गोळी गेली. तेथे आम्हास मांडीवर गोळी जेजालेची लागली. वरकड तेथे दाहाबारा बारगीर पडले. गवताचे दाटीमुळे यमुनेचे काठी निकड जाली. फौजेचे तोड न लागले. तसेच सतर कोस चालले आलो. त्यांनीं वीस कोस पाठलाग केला. प्रथम सरदारासी गाठ पडल्यामुळे फौजेस तेज न राहिले. अतांच वाधवई खबर आली कीं राा दत्ताजी सिंदे जिवंत जखमेत चूर आहेत. ते मागून येतात म्हणोन लुटलेली माणसे येत्यांत ते सांगत्यात. शुभवार्ता जाणून लि॥ असें. ये समई आमचे समागमे पाचसात हजार माणूस असते तर श्रीकृपेनें श्रीमंत स्वामींचे सेवेंत चाकरीचा मुजरा दिसोन येता; व येईल तो श्रीकृपेने सुदीन करणे अर्ज करणे हे व्रत श्रीमंत स्वामींचे सेवेसी विनंती लि॥ नाहीं यास्तव अर्ज करणे. कृपा करणार धणी समर्थ आहेत. भेट होये तो सुदिन. तिलशर्करायुक्त पाठविले आहेत. भक्षून उतर पाावे व पावते करणे. हरप्रकारे खाविंद कृपासागरता करीत ते करणे. जिणे थोडके व सेवाधर्मी तत्पर. श्रीमंत कृपा करोत हे विनंती.

[१-१-१७६०]

## 114a

@D [23-1-1760

श्री.

छ ४ जमादिलाखर माघ सीतैन.

पुरवणी श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे सेवेसी विज्ञापना ऐसीजे. पश्चमेकडुन आबदालीची दाटी जाली. याकरीतां राजश्री दत्ताजी सिंदे व जनकोजी सिंदे सुकुरतालाहून कांहीहि दार मदार न करतां वाहियात्कारे सी सुजाउदौला व पारच्या रोहील्यासी व नजीबखानासी श्नेहसंदर्भ न करतां उठुन आबदालीवर आले. याजकरतां रोहिले व सुजाउदौला केवल इकडल्या (स)ळुकांसी ना उमेद जाले व चित्तांत पूर्ण जाणलें कीं हे आबदालीची फते केल्यावर आम्हांस व आमच्या मुलकास सहसा सोडीत नाहींत. आबदाली तों आपलाच बोलाविला आला आहे. अतःपर त्याचीच पुर्ती रफाकैत करावी व [सर्वमि]ळून यांच्या पराभव ऐ * * * * * * हिंदूस्थानातून यांचा पाय नीघे. बल्की येथे * * हि विचार घाटीतात कीं याचा पराभव * * * यावर तैमूरशाहास दिलींत आणुन पातशाह करावे, सूजाउदौलाने वजीर व्हावे, नजीबखाना ने मीरबक्षी व्हावे, व दिली हिंदूस्थान कायमे करावें. कां कीं तैमूरच्या औलादीत कोन्ही पातशाहत राखीसा नाहीं व आपल्या हातींहि नाहीं. वजीर तर केवल मऱ्हाठ्यांचाच. मऱ्हाटे व वजीर यांचा बोलबाला जाल निशाने आम्हास जागा नाहीं, याकरतां सर्वात्मना आबदालीसच बळवावे येथ पर्यंतहि मनसबे घाटले. सुजाउदौलानी व पारच्या रोहील्यानीहि मनसबा बरा आहे म्हणुन मानिला. परंतु इतके परीछिन वादें नागवे उघडे होऊन आबदालीची रफिकत करावी व शामील व्हावे. यास राजी न (जाले. पार) चे रोहीले तर पारच्या कांठीच आहेत. सुजाउदौला दोन तीन मजली पलीकडे जाउन * * * * हे जोंवर आबदालीची व मऱ्हाठ्याची गो [लागोली] तत्वी होय तोवर तेथेंच राहतील * * * खाही छ २९ राखरे पावेतो सुकुरतालातच आहे. परंतु त्याची वासना व उत्कृष्ट हेत आहे कीं मऱ्हाठ्या फौजा व वजीर यमुनापार गेल्यावर, आपण फौजे सुधा धावून, बुडियाचे घाटे यमुना उतरून, अबदालीस शामील व्हावे, ऐसा त्याचा बेतु फार आहे. बल्की येथवरहि त्याचा बेत कीं जर मी पावल्याअगोदर मऱ्हाटे अबदालीवर शेर जाले व आबदाली बुडियाच्या घाटे यमुना उतरून अंतरवेदीत आला तर निदान पारचे रोहिले व आपण शामील होऊन जुजावें. जर पळून मागती अटकेकडे गेला तर अलीगोहर शाहजाद्यास पटण्याहून आणून पारवाले व सुजाउद्दौला व बंगालेवाला त्याचे रफीक १ होऊन फितूर उभा करावा. ऐसा नजीवखा बहुत वलगना व खटपट करू इच्छितों. पहावे ईश्वर इच्छा काय आहे. यद्यपि मनसबा तर भारीच पडला * * आहे. रजपुताकडे राजश्री मलारजी होळकर (गुतले) * * * चहुंकडून दुशमान फौजाही भारी व सारे अमित्र. परंतु स्वामीचा पुण्यप्रताप व थोर प्राक्तन सिकंदर ताले २ व सिंदे मोठ्या हिमतीचे माणूस जवांमर्द शूर पराक्रमी. येवढे आवडंबर आले असतां किमपि भय अगर चिंता किंवा कसे होईल हा उद्योग ज्याच्या मुखश्रीवर दिसतच नाहीं. श्रीमंताच्या पुण्यप्रतापे मारूनच घेतो हेच तोंडावाटे अक्षरें निघतात. श्रीस्वामीची फते व बोलबालाच करील. श्रुत होय. बहुत काय लिहिणे. कृपा केली पाहिजे हे विनंती.

[१ मैत्री.]

[२ बलकी=किंवा बहुना.]

[३ औलाद=कुलः]

Discussed in (1)