Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.120: [1-3-1760] Gangadhar Yashvant writes to the Peshwa an account of his activities against Abdali.

Selections from the Peshwa Daftar 2.120

Language
Marathi

2.120

श्री मोरया.

छ १९ साबान सन

सितैन चैत्र वद्य २

श्रीमंत राजश्री ...... पंत प्रधान

स्वामीचे सेवेसी

विनती सेवक गंगाधर यशवंत कृतानेक सां नमस्कार विज्ञापना. येथील कुशल ताा छ १२ रजब साहेबाचे कृपा कटाक्षेकरून सेवकाचे वृत यथास्थित असे विशेष. स्वामीनी छ ५ जमादिलाखरचे आज्ञापत्र पाठविले ते छ ९ रजबी श्रीयमुनातीरचे मुकामी पावून, लेखनाभिप्राये अवगत जाला. जैपूरचे कार्यास न गुंतता आविलंबे दिलीकडे जाऊन, गिलज्याचे पारपत्य करावे म्हणून पत्री आज्ञा. त्यास याजपेक्षा दुसरी गोष्ट विशेष नाही. जैसे जाणून, दर मजल दिलीकडे अलो. राजश्री जनकोजी सिंदे, आम्ही येकत्र होऊन, सविस्तर वृत्त येक दोन कासीद पत्रे देऊन रवाना केले आहेत; ते पावले असतील. सांप्रत आपली थोडी बहू फौज मोगलाच्या शहवर ठेऊन, काल मुकाम सिकंदरियासि केला. जर गिलजे रोहिले येमुना उतरून आले तर श्रीगंगाचे * * पार रोहिल्याच्या मुलकांत लढा * * * वी. कदाचित इकडे नच येत, तर रोहिल्याचा मुलूक पारचा व आलीकडील मारून, वैराण करून, फिरोन येमुना उतरोन, अबदाली रोहिले यांच्या मुकाबल्यासि जावे; व या उद्येशे इकडे आलो. येका दो दिवसांत मोगलाचा सूख ध्यानास येईल. त्याजप्रमाणे तजवीज केली जाईल. तजविजीने शत्रूवर आपली दहशत बसऊन आपले लोक सेर केले पाहिजेत. थोड्याच दिवसांत ईश्वर सत्तेने व स्वामीचे पुण्यप्रतापे करून आमित्राचे पारपत्य होऊन येईल. * शेवेसी श्रुत होये हे विज्ञापना