Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.121: [13-3-1760] Purushottam Mahadeo Hingane gives a description of a skirmish between Gangadhar Yeshwant and Najibkhan and mentions details about the negotiations which the Scindia and Holkar were carrying on with Abdali through Hafij Khan on the point of Najibkhan being held in check.

Selections from the Peshwa Daftar 2.121

Language
Marathi

2.121

श्री.

पौ छ १८ साबान सन सितैन

श्रीमंत राजश्री भाऊसाहेब स्वामीचे शेवेसी.

विनंती सेवक पुरुषोत्तम माहादेव कृतानेक सां। नमस्कार विनंती. येथील कुशल ता॥ छ २४ माहे रजब मु॥ सारोट नजीक मौजे बयाना स्वामीचे कृपावलोकने करून येथास्थित असे विशेष. या प्रांतीचे तपसीलवार वर्तमान श्रीमंत स्वामीस विनंतीपत्रीं लिहिले आहे त्याजवरून श्रुत होईल. सारांश अबदालीस दमवावे व रोहिल्याचा अंतरवेदीतील व गंगापारील मुलूक खराब करावा या इराद्याने सरदार अंतरवेदीत जाऊन सिकंदराबाद लुटून पस्त केली. दाहालक्ष रु॥ खजाना नजीबखानाचा गंगापार त्या कांठपरियेंत अनुपशहराजवल आला होता म्हणोन गंगापायांब पाहावया निमित्य शोधक पाठविले. तेथे तीन च्यार दिवस मुकाम केले. अबदालीस हे वर्तमान कळताच जैपुरचा सूख सोडून दिल्लीस गेला; तेथून जहानखानास व नजीबखानास तिसापसतीसा हजारा जरीदे फौजेनसी अंतरवेदींत पाठविले. रा। गंगाधर यशवंत सरदाराहून च्यार कोस पुढे होते. तेथें येऊन जुंज घेतले. दोनच्यार घटिका * * * गले जुंज जाहाले. तेथें रा आनं * * राम व शेटाजी खराडे व त्याचा पुत्र पैसे तिघे जण कार्यास आले. तेव्हां रा गंगाधरपंत माघारे फिरले. सरदार आगऱ्याच्या मैदानात आले व पंतमजकूर मथुरेस गेले. तेथून भरतपुरारा येऊन नवाब वजीर यांच्या विद्यमाने हाफीजरमतखानाचे सलुखाचा जाबसालाचा मजकूर पूर्वी सो लिहिला आहे त्या प्राा त्याचे वकिलास बोलावून पाठविले. आम्हासहि डिगेहून बोलविले. आम्ही भरतपुरास येऊन हाफीजरहमतचे वकिलास रा गंगाधरपंतासी भेटविले. हाफीजरहमताने सरदारास येऊन भेटावे व अब्दालीस मार्गस्त करावे व फौजे-सुधा शामील व्हावे. नजीबखानाचे पारपत्य होईल. त्याची कुमक न करावी. सरदारानी त्याच्या वाटे न जावे व त्याच्या मुलखासी मुजाँहिम न व्हावे. या प्रकारे करार होऊन आणभाष शपथ देऊन वकिलास रुखसत केले. सरदारहि भरतपुराजवळ पंधरा सोला कोसाचे अंतराने आले. तेथे सुरजमल येऊन भेटला. सरदारानी बेलभंडार गंगाजल आणभाश शपथ दिली. पूर्वी जे जे करार केले होते, ज्यांत सरदाराची मर्जी असेल तेच गोष्ट करावी. सुरजमलास वस्त्रें प्रावर्णं देऊन रुखसत केले. तो भरतपुरास गेला. सरदार कुच करून दाहाकोस मौजे बयानाहून सारोटास आले. पुढे निदर्शणास येईल ते सो विनंती लिहू. कृपा केली पो हे विज्ञप्ति.

[१ पलीकडील.]