Selections from the Peshwa Daftar 2.122: [31-3-1760] Naro Babaji Nagarkar, Kiledar of Ahmednagar, submits a list of ammunition to be approved by the Peshwa to be despatched with the armies proceeding to the North. The details of the list will be serviceable in determining what kind of ammunition was being manufactured here.
Selections from the Peshwa Daftar 2.122
- Language
- Marathi
2.122
श्री.
पौ छ १३ शाबान
चैत्र सु सितैन
श्रीमंत राजश्री......पंतप्रधान स्वामीचे सेवेसी.
विनंती सेवक नारो बाबाजी सां नमस्कार विज्ञापना. ताा छ साबान पावेतो स्वामीचे कृपावलोकने करून सेवकाचे वर्तमान यथास्थित असे. यानंतर हुजूरचे आज्ञापत्र सादर जाहाले. तेथे आज्ञा कीं स्वारीतील जिनस सरला.
[१ प्रतिबंध करणारा.]
[२ निरोप.]
196 हिंदुस्थानाचे स्वारीस जिनस जंगी पाठवावयासी पाहिजे. याजकरिता सरंजाम येणे प्रमाणे किले नगर येथील जकिऱ्यापैकीं खाना करणे. बित।।
गोळे तोफाचे ब।। फरम्याची याद
सुमार
१९०००
सिसे वजन पके खंडी
१०
कागद फिरगाणी रजमे सुमार
२०००
साल मजकुरी दारू नवी आली आहे. वैजापुरपैकीं वगैरे त्या दारूपैकीं दारू वजन पके खंडी
४०
गारा फतरी सुमार
१०००००
सदरहू प्रमाणे जिनस खाना करणे. दारू सिसे आणावयासी येथून पाचसे बैल पाठविले आहेत. याजवर खाना करणे. तोफाचे गोळे बैल भाड्यानें करून फर्म्याप्रमाणे पाठवणे म्हणून आज्ञा. त्यास हुजूरून बैल पाचसे खिजमतगारासमागमे आले, व आम्ही नगरी भाड्याचे बैल करविले अडिचसे. येकूण साडेसातसे बैलावर जिनस भरून खाना करितो. बित।।
तोफाच्या गोळ्याची नेमणूक येकुणीस हजारपैकीं हुजुरचे फर्में आले, त्याप्रमाणे किल्यात होते, ते गोळे सुमार
८१८४
सिसे खंडी नेमणूक दाहा त्यापैकीं सिसे खंडी
५ पुण्यातून सिसे किल्यात आलेपैकीं होते ते सिसे
३ खणी पैकीं
८
दारूची नेमणूक चालीस खंडी त्याप्रमाणे दारू वजन पके खंडी
४०
गारा फतरी नेमणूक येक लाख पैकी खानागी गारा सुमार
९९१९० फिरगाणी कागद रजमे नेमणूक दोन हजार पैकीं शहरात शोध केला. फिरगाणी कागद मिळत नाहींत. साठसतर रजमे मिळाली ती पाठवितो. आणखी तलास करितो. जी मिळतील ती पाठवितो.
[जकिरा=कोठार सामुग्री.]
येकूण गोळे आठहजार येकसे चौऱ्यासी व सिसे खंडी आठ व दारू खंडी चाळीस व गारा नव्याणव हजार येकसे पनास, व फिरगाणी कागद मिळतील ते, असे बैल भरून, वाटेन प्रजन्यकरिता पाले व दारूच्या बैलावर चवाली देऊन, रवाना करितो. बैल भाड्याचे बराणपुरपावेतो केले. भाड्याचे बैल न मिळत. मोठ्या प्रेत्ने बैल मिळाले. वाण्यानी करार करून दरम्यान मध्यस्त घेतला कीं, बराणपुरापुढे न न्यावे. दर बैली बारा रुपये प्रमाणे भाडे केले. म्हणून नगरीहून राजश्री धोंडो माहादेव याणी लि॥ आहे. त्यावरून आम्ही त्यास लिहिले कीं बैलास भाडे फार पडते. यात रुपया दोन रुपये दर बैलास कम करून बैल करार करावे. हिंदुस्तानाचे स्वारीचा जिनस बैल भरून छ १२ सावानी गंगेवर येतील. याशिवाय हुजुर दारू व गोळे सिसे आणविले आहे. फर्म्याप्रमाणे गोळे भरतील ते व सिसे दोन खंडी खोपैकीं व दारू असे च्यारसे साडेच्यारसे बैल भाड्याचे करून जिनस भरून तेहि बैल येकादोदिवसाचे अंतरेयाने येतात. हिंदुस्तानाचे स्वारीच्या जिनसाचे भाड्याचे बैल बराणपुरपावेतो गेलियावर तेथे दुसरे बैल भाड्याचे करून या भाड्याचे बैलास माघारे यावयाची आज्ञा देविणार स्वामी समर्थ आहेत. दारू पंचवीस खंडी तीस खंडी किल्यात नवी होती ती व जुनी दारू चांगली केली होती ती असी रवाना केली आहे. किल्याचे बेगमीचा जंगी जिनस दारू व गोळे व सिसे होते तेहि हिंदुस्तानाचे स्वारीस व हुजुर रवाना केले. किल्याची बेगमी जकिन्याची करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
[1760 ?
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English