Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.123: Naro Shanker is asked to keep the Bharatpur road safe for supplies.

Selections from the Peshwa Daftar 2.123

Language
Marathi

2.123

श्री.

शेवेसी विज्ञापना. राजश्री नारो शंकर याची फौज राजश्री मनोहरपंतासमागमे दिल्ही होती. येथेहि फौजेचे प्रयोजन आहेच. भरतपुरीहून रसद कुंभेरीस येणार. त्या मार्गाचा बंदोबस्त त्यांजकडून करावा. राजश्री मनोहरपंता समागमे याच्या फौजे खेरीज लाँक नेमून दिल्हेच आहेत. याच्याहि फौजे पैकी सेपनास स्वार देणे तर देवावे आणि वरकड त्याची फौज बोलवावी म्हणजे भरतपूरच्या मार्गाचा बंदोबस्त राखतील तर त्याची फौज बोलावली पाहिजे. शेवेसी श्रुत होये हे विज्ञाप्ति.