Selections from the Peshwa Daftar 2.124: [12-6-1760] Malharrao Holkar's letter to Vishnu Mahadeo Gadre, Banker of Poona, giving details of the situation of the Maratha and Mussalman armies and adding that Hafiz Rahmat has come from Abdali with proposals of peace and that Gangadharpant was sent on to interview him.
Selections from the Peshwa Daftar 2.124
- Language
- Marathi
2.124
श्री.
राजश्री विष्णु महादेव गोसावी यांसी.
छ अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो मलारजी होळकर दंडवत सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. तुम्हीं पत्र टॉक्यांचे मुकामीहून पाठविले ते पावून लेखनार्थ अवगत जाला. ताा कोऱ्हाळे येथील व चांदवडच्या कुरणाचा मजकूर व सुरतराम महता याजकडील येवजाचा मार तपसिले लिहिला तो सर्व कळला. येसियासी श्रीमंत राजश्री भाऊ साहेबहि चमेल उतरोन आले; सत्वरच भेटी होतील. त्यासी विनंती करून कोऱ्हालियाच्या कमाविशदारास व आपाजी हरि चांदवडकर यासी ताकीद पत्रे घेऊन पाठवितो. येवजाविषयीं सुरतरामास ताकीद केलीच आहे. रुपये पावते करील. इकडील वर्तमान तर प्रस्तुत आपला मुकाम प्रांत जटवाडा येथे गिलज्या कोलेवर अंतरवेदीत आहे. नजीबखान व ज्याहान इटावाियाकडे गेलेत. गिलज्याच्या फौजेतून हाफीजरहिमतखान रोहिला भरतपुरासी आला. आपले राजश्री गंगाधरपंत आहेत. रोहिलीयाने सल्लाखाचा संदर्भ केला, परंतु आपल्या विचारानुरूप बनत नाही. श्रीमंतहि संनिध आले. अवघ्या फौजा येकत्र जालिया श्रीइच्छेने शत्रूचे पारपत्य होऊन येईल. तुम्हीहि श्रीमंतास विनंती ताकीद पत्राविशई करोन होईल कार्य ते करून घेणे. सर्वदा पत्र पाठऊन वर्तमान लिहीत जावे. राा छ २७ सवाल बहुत काय लिहिणे हे विनंती.*
[seal: मोर्तब सुद.]
[* ता. ६ जुलैस होळकर व सदाशिवराव यांच्या भेटी झाल्या. त्यापूर्वीचें पानिपत मोहिमेचें पत्र.]
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English