Selections from the Peshwa Daftar 2.125: [11-5-1760] Sadashivrao Bhau acknowledges the drafts of money supplied by Babuji Naik.
Selections from the Peshwa Daftar 2.125
- Language
- Marathi
2.125
श्री.
राजश्रियाविराजीत राजमान्य राजश्री बाबूराव राम स्वामी गोसावी यांसी.
पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीये लिहित जाणे विशेष. तुम्हीं पत्र पाठविले ते पावले. उजनी व इंदूरच्या हुंड्या रुपये.
१२५००० तुम्हीं पुण्याहून पाठविल्या.
२५००० अंताजी नारायण याजवर इंदूरची १
१००००० उजनीच्या
२५००० लखमीचंद अजबसिंग यावर १
५०००० वलभ सुदर १
६००० कळु संकरसा १
१९००० मोहनजी नाथुराम ३
१००००० ६
१२५००० ७
६३००० भगवंत भैरव थथे याजकडून तुम्ही रवाना करविल्या त्या.
१६५०० इंदूरच्या
५००० हरचंद किसनचंद यावर १
४००० नानासा दुलभसा २
४००० हसराज देवराज २
२५०० नाना महता २
१००० रूपसा देवीलाल १
१६५०० ८ ४६५०० उजनीच्या
१०-००० हरचंद किसनचंद ३
१५०० नाना महता १
७००० गोपाळदास गोकुळदास २
७००० मोहनी नाथुजी १
४००० मोहनी विठ्ठलजी १
२००० पुंज्यासा अमोलक १
१९००० चिंतामण हिराचंद १
४६५०० १०
६३००० १८
१८८००० २४
येकूण चोवीस हुंड्या एक लक्ष अठ्यासी हजार रुपयाच्या पाठविल्या त्या सिरोजच्या मुकामी पावल्या. येथून सावकाराकडे उजनी इंदुरास रवाना केल्या आहेत. सावकारांकडील मुदतीप्रमाणें ऐवज वसूल जालियावर तुम्हास लेहून पाठवूं. रा॥ छ २४ रमजान सु॥ सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे हे विनंती.
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English