Selections from the Peshwa Daftar 2.128: [19-8-1760 ?] Trimbak Krishna Kanitkar, the Peshwa's accountant residing with Govind Ballal Kher, writes to Bhausaheb about Maratha activities in the Doab and the troubles of Govindpant Bundele.
Selections from the Peshwa Daftar 2.128
- Language
- Marathi
2.128
श्री.
श्रीमंत राजश्री भाऊ स्वामीचे सेवेसी.
विनंती शेवक त्र्यंबक कृष्ण व जनार्दन राम नि।। गंगाधर बाजीराव कृतानेक सां। नमस्कार विज्ञापना ता॥ छ ७ मोहरम मुकाम अहीरवं पा॥ मइनपुरी प्रांत अंतरवेद स्वामीच्या कृपावलोकने करून वर्तमान यथास्थित असे विशेष. अंतरवेदीत आल्यावर सविस्तर वर्तमान पुर्वी शेवेसी विनंती लिहिली आहे त्यावरून विदित जाले असेल. सांप्रत आजपर्यंत अंतरवेदीतील दोनतीनशें गढी मवासी हस्तगत जालीं. त्यामध्यें कांहीं सरकारी ठाणी ठेविलीं, कांहीं पाडून टाकील्यां, याप्रमाणे अमल सुरळीत स्वामीच्या प्रतापें अंतरवेदींत होत आहे. फार करून अंमल सुरळीत जाला; कांही राहिला आहे तोहि थोडक्याच
१ जमाव.
दिवसांत सुरळीत होईल. विदित असावें. ये विसीचा सविस्तर अर्थ राजश्री गोविंद बल्लाळ शेवेसी लिहीत असतील त्यावरून विदित असेल. पथकांतील अर्थ आजपर्यंत शंभर माणूस जखमी व मयेत वीसपंचवीस याप्रमाणें वर्तमान. पर्जन्यकाल, फिरती छावणी व कुंभेरीवरीलहि हैरानगत, लोकांस मेहनत भारी पडली. पुण्यांत समजावीस भारी निघाली, त्याजमुळे नालबंदी कमी पावली. स्वारीत रोजमरा झाडून न पावला. याजमुळें आदा थोडा जाला. बाकी फार निघाली. नेमणुक छावणीस रवानगी जाली तेसमईं कोती जाली. ये विसीचा सविस्तर अर्थ पूर्वपत्रीं विनंती लिहिलीच आहे. त्यावरून जाजती ऐवजाची सनद गोविंदपंतास रवाना जालीच असेल. कदाचित सनद रवाना जाली नसेल तरी हली सेवेसी विनंती लिहिली आहे. जाजती ऐवजाची सनद राजश्री गोविंदपंतास पाठविली पाहिजे, म्हणजे लोकांची स्थीत राहील. छावणीचा कारभार विदितच आहे तेथे शेवकलोकांनीं काये लिहावें. शेवेशी विदित होये हे विज्ञापना.