Selections from the Peshwa Daftar 2.129: [26-8-1760] The hand-writing shows the letter to be from Vithal Shivdeo to some other officer, both at some distance from the main camp. The letter as it is, cannot be fully explained.
Selections from the Peshwa Daftar 2.129
- Language
- Marathi
2.129
श्रीशंकर.
विनंती उपरी. आज आम्ही उतारावरून नदी उतरून आलिकडे आलों. ढाला व डेरे आगोधरच आले होते. व ताकपीर व नागरमल आलिकडे आले होते ते माघारे पलीकडे गेले. याचा विचार काय आहे? वजीर आज सिकंदन्यास आले. त्याचे भेटीचा विचार काय केला आहे हे ल्याहावे. आम्ही उदईक पटपटगंजावर जावें की काय? रोहिल्याची फौज अलीकडे आली होती ते माघारी गेली. पटपटगंजावर गेलियानें त्यांस दहशत पडेल. कदाचित लाहोराकडे रोहिले जाऊं लागले तर संडे होऊन त्याचे पाठीमागें जावे लागेल; तर याचा विचार करून ल्याहावे. वजीर आले तर आम्ही पटपटगंजावरोन माघारे भेटावयास येऊं व उदईक श्रावणी आहे तर याचा विचार करून ल्याहावें. उदईक आपला मुकाम पलीकडेच होईल कीं अलीकडे होईल. आलीकडे येणे तर लागलेच पटपटगजावरी जावें. वजीरास सामोरे येणे हे नदी पावेतो यावें. मेरटेचे काम यावर लांबणीवर पडत नाहीं. फौज उतरली ह्या आश्रयावर दम धरला होता. याउपर ठाणे दम धरीत नाहीं. कदाचित दम धरला तर मग जे तजवीज करणे ते करावी. श्रीमंताची पत्रे आज आली त्यांचा भाव कांही उत्तम नाहीं. भेटीनंतर बोलणे ते बोलूं. उतर पाठवावे त्याप्रमाणे कूच मुकाम करणे तर करूं. बहुत काय लिहिणे हे विनंती.