Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.130: [15-9-1760] Bapuji Ballal Phadke writes from Delhi to Naro Appaji at Poona and communicates the awkward predicament of Maratha forces owing to starvation, full five months previous to the final battle.

Selections from the Peshwa Daftar 2.130

Language
Marathi

2.130

श्री.

राजश्रिया विराजित राजश्री नारोपंत नाना स्वामीचे सेवेसी.

पोष्याय बापूजी बलाल सां। नमस्कार विनंती. येथील कुशल ता॥ छ ५ सफर मु॥ दिल्ली यथास्थित असे विशेष. आपले पत्र आले पावून आनंद जाला. इकडील वर्तमान तर यमुनेचे पाणी उतरावयास महिना पंधरा दिवस पाहिजेत. उपरातिक लढाई होईल. सला होता दिसत नाही. लस्करात मोठ मोठे माणसांस फाके जातात. घोड्यास दाणा ठाऊक नाही. लस्कर गळाले. कर्ज कोठे मिळत नाहीं. अशी तर्वाई आजपर्यंत कधी गुदरली नव्हती. घोड्या माणसांत जीव राहिला नाही. श्रीमंताचे दैव थोर आहे. परिणाम कठीण दिसतो. याचमधे सर्वांची आबादी दिसोन आली. सर्व गोष्टीने असे साल पाहिले नव्हते. सदैव पत्रीं सांभाळ करावा. चिरंजीव तात्यास आमचे जांगास आपण आहेत. सर्वप्रकारे सांभाळ करावा. विस्तारे लिहिणे नलगे. बाळकृष्ण पंताविसी काळजी न करावी. बहुत काये लिहिणे. तातडीने पत्र लिहा. मागाहून सविस्तर लिहून पाठऊं. राजश्री धाकटे नानास पत्र आपण लि॥ त्याचा जाब पा॥ आहे हे विनंती.

Discussed in (1)