Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.131: [15-9-1760] Nana Phadnis's letter to his uncle Baburao, saying negotiations of peace had failed and that the issue depended upon a final fight.

Selections from the Peshwa Daftar 2.131

Language
Marathi

2.131

श्री.

पौ छ १४ रविलावल सन इहिदे आश्विन.

तीर्थरूप राजश्री . . . . . बाबा वडिलाचे सेवेसी.

आपल्यें बाळाचे साष्टांग नमस्कार विनंती. येथील वर्तमान तागाईत छ सफर मुकाम इंद्रप्रस्थ यथास्थित असें विशेष. ईकडील वर्तमान तर दिल्ली किल्ला श्रीमंतांनीं घेतला हें पूर्वी लिहिलें आहे. त्यावर अबदाली अनुुपशहराकडे होता, तो दिल्लीजवळ पलीकडे येऊन राहिला. त्यास पाणी यमुनेस फार, उपाय नाहीं. नावा सर्व होत्या त्या आपले हातीं लागल्या. तेथेंच मुकाम करून राहिला आहे. श्रीमंत अलीकडे आहेत. सर्व फौज दिसतें. सुज्यातदौला नजीबखान सर्व रोहिले मिळाले आहेत. सल्लयाचा मजकूर सुज्यातदौला बोलतो तो लबाड आहे, परिणाम नाहीं. आपली फौज भारीच आहे; परंतु पोटास नाहीं. घोडीं दाणा खावयास विसरलीं. माणसांस अन्न मिळतां कठीण दिवस इतकेंच मात्र संकट आहे; त्याची तजवीज महालकरियांकडील ऐवज येईल तेव्हां फौजेस पोटास मिळेल. कर्ज तों कोठें मिळत नाहीं. फौज आपली भारीच आहे. महिन्याभरां पाणी उतरेल. लढाई मातबर व्हावी असा विचार दिसतो. त्यामध्यें दम दिसतो. आपली सारी फौज येकदिल आहे. श्रीमंतांचें प्रारब्ध थोर आहे. सर्व अरिष्टें वारतील. पारपत्य लौकरच होईल. पुढें होईल मनसबा तो लिहून पाठऊं. बहुत काय लिहूं. कृपा करावी हें विनंती.

[१ तवाई=संकट.]