Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.132: [October 1760 ?] Govindpant Bundele's letter to some Chintopant as regards Maratha outposts being deserted.

Selections from the Peshwa Daftar 2.132

Language
Marathi

2.132

श्री.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री चिंतोपंत स्वामी गोसावी यांस

सेवक गोविंद बलाल नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे विशेष. फर्कांबदवाल्यांनी अकबरपुरच्या जमीदारास चिठ्या लिहिल्या कीं तुम्ही गुंळु करून ठाणे उठउन देणे म्हणजे आम्ही येतो. केवळ आमचे ठाणे असतां त्याच्याने येवत नाहीं. ते बदनामीस आमचे ठाणे उठवित नाहीं. युक्तीने गंवरांकडु ठाणी उठऊन म(ग) आपण तुमची ठाणी उठोन गेली म्हणून बसविलें असें म्हणतात. यास्तव आमचे ठाणे असतां ते येत. जमीदारांस मात्र पठाणाने लिहिले त्याजवरून जमीदार हुलकावितील तर सावधानी ठाण्याची करून राहाणे. जमीदारांचा कोणाचाहि विस्वास न धरणे. आम्हीहि समीपच आहो नजीबखान माघारा सरकला म्हणजे आम्ही पुढे मोहऱ्या‍वर येतो. च्यार रोज सावधान राहाणे. बहुत काये लिहिणे. लोभ असो दीजे हे विनंती.

[१ गुळू=दंगा.]