Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.133: [26-11-1760] This is an important letter of Naro Gangadhar despatched from Sidhtek near Poona, probably to Bhausaheb. It gives details about Peshwa's marriage and his culpable indifference to affairs in the North.

Selections from the Peshwa Daftar 2.133

Language
Marathi

2.133

श्री.

शेवेसी नारो गंगाधर कृतानेक सा॥ नमस्कार विज्ञापना. ता॥ कार्तिक वद्य चतुर्थी मु॥ सिधटेक वर्तमान स्वामीच्या आशीर्वादें यथास्थित असे विशेष. इकडील वृत्त तर खासा श्रीमंत हिंदुस्थानांत जाणार. बंधूसहितहि जावे येक विचार येक प्रकार त्याजबा दाहा पाच हजार फौज देऊन देशी ठेवावे, आपण खामखा जावे. निजामअलीस बाा घेणार असेहि आहे. त्याणे उगेच राजकारण लाऊन ठेविलें आहे. कागदीपत्री ममता दर्शवितो परंतु लबाड कारभार. हिंदुस्थानच्या मनसब्यावर त्याची दृष्टि आहे. तिकडील काय होते हे पाहातात. तूर्त यासी सलुखाने लिहिण्या पुसण्यात दर्शवितात. श्रीमंत लग्न मार्गसीर्ष मासी आपले निश्चयरूप करणार. वधुविचारणेस जिकडे तिकडे पाठविले आहेत. कऱ्हाडे, देशस्त, चिपोलणे यात जी अनुकूल पडे ती करावी हा निश्चय. लग्न जाल्यावर वराडातून चांदे देवगडच्या मार्गे प्रयागास जावे हा सिधांत. हिंदुस्थानच्या ग्रहस्तांची तो काळजी अगदी सोडली. त्यांचे स्मरणहि नाही. त्यांचे साहित्याची चर्चाहि करणे अनुकूल पडत नाही. प्रस्तुत सिधटेकाहून कूच जाले म्हणजे तोफखाना व काही फौज बाा सखारामपंत असे नगरावरून धारूरचे सुमारे लावणार, आपण करमलेयास जाणार. जानोजीचा लेक येथे आला आहे. करमलेयास जरूर जाणार. वरकड प्रकृत तो दिवसे दिवस येक प्रकारच होत चालली त्याचा विस्तार काय ल्याहावा ? महालकरी पथके पागा यांस दरबार खर्चाच्या यादीविसी पुरसीस चालली आहे. यादी कुल जमा करितात. तूर्त पोतेनिशिची घालमेल जरूर होणार. सवा लाख इजारा जो करील त्यांस देणार. जुनेयांस तो ठेवित नाहीत. असा निश्चय आपले जागां करून ठेविला आहे. कुशाबांचे गला फार फार पडले आहेत. तो कबूल करीत नाही. इजारा होईना म्हणतो. परंतु फार गलाच पडले आहेत. शेवटास जाईल ते खरें. श्रीमंत राजश्री मोरोबादादांस यास च्यार दिवस थोडकासा ज्वर आला. त्यामुळे दरबारास न गेले म्हणऊन परभारे श्रीमंत रायांस चिटी लि॥ की हे आमचे म्हटले आइकत नाहीं, तूर्त बरे वाटत नाही. यांस फजित करून लिहिणे की आमचे आइकत जात व तूर्त घरी घेऊन जाऊन औषध देऊन बरे होऊन पाठवून देणे असे लि॥. निमित्य तो काही दिसत नाहीं. काय चितात आले देव जाणे. अशे प्रकारचे तमासे जाले आहेत. वर्तमान कलावे म्हणोन लि॥ असे. कृपा करावी हे विज्ञापना. मागाहून सविस्तर लिहून पाठवीन.

Discussed in (1)