Selections from the Peshwa Daftar 2.134: [6-12-1760] Bhau's instructions from the field of Panipat to Gopalrao Ganesh who along with Govind Balal was acting in the Doab.
Selections from the Peshwa Daftar 2.134
- Language
- Marathi
2.134
श्रीगजानन.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
गोपालराव गणेश स्वामी गोसांवी यांसी,
पो सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणे विशेष. तुम्ही छ १३ रविलाखरचें पत्र पाठविलें तें पावलें. लिहिले वर्तमान सविस्तर कळलें. आज्ञेप्रमाणे आपले फौज सुधा पार उतरतों, सरकार काम यथास्थित करून लिहितों, जमीदार आदीकरून सिधच आहेत म्हणुन लिहिले, ते कळलें. जैसेयासी उतम आहे. सत्वर पार उतरोन सारे जमीदार हातीं घेऊन लिहिल्याप्रमाणे कार्य करून दाखविल्याने तुमचे चाकरीचा मजुरा आहे. नाहींतर बोलावें फार, होऊन कांहींच न ये, असें जाहाल्यानें आहे विचार तो कलतच आहे. तरी जपून सर्व यथास्थित सत्वर बज्याऊन दाखवणे. तुमची फौज राजश्री गोविंद वलालाबरोबर होती, ती तुम्हाकडे येईलच, व राजश्री गणेश संभाजी याजलाहि तुम्हाकडे यावें अगर फौज पाठऊन कुमक करणे म्हणोन पत्र पाठविलें आहे. त्याकडे पाठऊन फौज आणवणे. तुम्ही याउपरी येकंदर दिरंग न लावणे. इकडे आवदालींचाहि आवभाव कलोन गेला. येकदोन लडायाहि सरदारांकडील किरकोळ फौजेसी जाहल्या. त्याचा मोड करून गोटांत सारून घात (त) ले. याउपरी त्याचा दम चालून येऊन लढाई करावयाचा राहिला नाहीं. सरकारच्या मोर्च्यास त्यांच्या मोर्च्यास बाणाबाणाची तफावत होती. ते सरकारच्या मोर्च्यापुढे जेजालेच्या गोलीवर धमधमा बांधून त्यावरी तोफा ठेऊन मार दिल्हा. तो त्याच्या डेन्यापावेतों लस्करांत लागू होऊन माणसें घोडीं मरूं लागली. त्या भयानें त्याणी तेथून कूच करून दोन कोस मागें सरून गेले. आपले मोर्चे देखील उठऊन नेले, हे त्याची हिमत आहे. लौकरीच पुतें पारपत्य यथास्थित होईल. दिवसेंदिवस कमहिमती होत चालले. सत्वरीच चांगले पारपत्य होईल. तुम्ही लिहिल्या गोष्टी करून दाखवाल, तेव्हां च फौज ठेविल्याचें, पैका खर्च केल्याचे, व उंमदगी मनात आणून लांबलांब लिहितां व बोलत होतां त्याचें सार्थक आहे. ही संध फिरून येणार नाहीं. सर्व हातीं घ्यावें. त्याचा अमल उठऊन आपला अमल करावा, हे खबर पाठवणे. जाणिजे. छ १९ राखर पार जमीदारानी दंगा केला होता. त्या दिवसांत आपली फौज न गेली. आतां जमीदार सुजातदौलाचे मातुश्रीने बेणीबाहादराने समजावले. असो जमीदारांस हालेंमाजी पाहिजेच. तुम्ही पार जाऊन दमाने जमीदार हाती घेऊन आपण तूट सोसून जमीदार न दुखवितां कार्य करणे. सर्व सामील होतील. ज्यास पत्रं पाहिजेत ते लिहिणे. पाठवून देऊं. मोगलाची फौजहि सुभ्यांत जमीदार तुम्हासी बिघडले तरी पेच पडेल. सारा बंदोबस्त जालियावर बारिक बंदोबस्त होईल. तूर्त सर्वांस सुखलग़ाम रजावंदी उमेदवार करून भारी जमाव करणे. सामील होतील त्यांवर कारकुनी तूर्त न काढणे. जागीर मनसबाविसी उमेदवार करणे. दिलीपर्यंत डांक बसवणे. आजुरा पडेल तो खर्च करणे. प्रतापगडवाले व बळवंतसिंग वगैरे सर्व हातीं घेणे. कासीमथें अमल होऊन जमीदारांमुळें उठला तसे न करणे. आपण उपास करून त्यास रजावंद करून मोठे काम करून दाखवणें. मेहनतीनेच सर्व थोर जाहले. ईस्वरे थोर यश दिल्हें तरी थोरपणहि होईल. सत्वर जाऊन काम करणे. रा। छ २७ राख़र हे विनंति. गंगापारचे रोहिले यांचे मुलकांतहि दंगा जमीदारांपासून होई हे जरूर करणे. जमीदार उमेदवार करावे तेव्हां सर्व होईल हे विनंती
[१ उमेदवारी]
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English