Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.136: [1758?]

Selections from the Peshwa Daftar 2.136

Language
Marathi

2.136

श्री.

विनंती उपरी. आम्ही आज कूच करून सालेमार बागा आलीकडे मुकाम केला. त्यास इकडून पाणिपतापलीकडून चाळीस पन्नास कोस बातमी आली कीं कोठें फौजेची आवाइ नाहीं. परस्पेरें आपल्याकडेहि बातम्या आल्या आस्तीक त्यास उदैक मंगळवारी आमचा मुकामच आहे तर आपण बहादूरखानास व नागरमलास इकडे पाठवावे. बनेल तर नवाब गाजुदीखानासहि इकडे पाठविले पाहिजे, म्हणजे मोगलपुरी याचे सूत्र ठीक करून कार्य करूं. नवाबाचे मारफातीचे मोंगल पुरियाचे सूत्र आहे याजकरितां नवाबांनी तेथे येऊन ठीक करावें. इकडे आम्हीहि जवळच आहे. तर अतःपर सुस्ती न करावी. बहुत काय लिहिणे हे विनंती.