Selections from the Peshwa Daftar 2.137: [Date of receipt 12-1-1761?] In the absence of further details about the writer, the addressee and the date this and the next letter cannot be properly deciphered. The mention of Gaziuddin Khan may refer this letter to an earlier date, i.e., the monsoon of 1758.
Selections from the Peshwa Daftar 2.137
- Language
- Marathi
2.137
श्रीशंकर.
पैवस्ति छ ४ जमादिलाखर.
राजश्री गणेशपंत व बाबूराव यांस.
विनंती उपरी. जाटाकडील फौज येमुनेचे घांटाने जागा जागा थोडी थोडी फौज उतरती, व तिकडे रोहिले पठाण यांची फौज गंगा उतरून फरकाबादेस येती. ऐसें वर्तमान येथें चहूकडून येतें. त्यास तुम्ही आपली फौज सावधपणें आसो देणें. जागा जागा महालांत स्वार पाठविले असतील ते कार्या कारण मात्र थोडे थोडे ठेवणें. वरकड सर्व आपले जवळ आणून ठेवणें. येथून जे क्षणी जसे पत्र जाऊन पोंहोंचेल तसे ते क्षणीच करणे लागेल. यास्तव लिहिल्याप्रमाणें तरतूद आसो देणें. रोहिल्याची फौज गंगापारीहून फरकाबादेस जमा होती. तुम्हावर तेथून दगा होणार म्हणून बातमी ऐकतों तरी बहुत सावध राहणें. फरकाबादेची बातमी चांगली राखणे. तुमची फौज महालो महालीं बहुत गेली आहे ते आपले जवळ बोलावून मजबुदीने राहाणे. महालाचे स्वार सारे उठून आणिण्यानें लौकिकांत वाईट दिसेल तरी तसें तरी न करावें. कार्याकारण राउत ठेऊन वरकड सर्व वलाऊन घेणें. चारणीस गेले असतील तेहि आपले जवळ आणवणे. खाना छ ३ जमादिलौवल बहुत काय लिहिणें हें विनंती.
पैवस्ति छ ४ जमादिलाखर.