Selections from the Peshwa Daftar 2.139: [1-2-1761] Charges of Bakhatsing Bhadorkar's troops for guarding military posts from the enemy.
Selections from the Peshwa Daftar 2.139
- Language
- Marathi
2.139
श्री.
शेवेसी राजे बखतसिंग भदौरकर विज्ञापना एसीजे, आम्हास सुभेदार व जनकोजी सिंदे यानी आज्ञा केली की तुम्ही सिवबंदी ठेऊन नाकेयाचा (बदो)बस्त करणे. सिवबदीचा ऐवज मजुरा दिल्हा जाईल. त्यावरुन नजीबखान व ज्याहानखान इटावाकडे आले ते समई सिबंदी ठेऊन नाकेयाचा बंदोबस्त केला. सिबंदीचा आकार रु. २६००० सवीस हजार आकार जाला त्यापैकीं सुभेदार व जनकोजी सिंदे यानी रु. १६००० सोळा हजार मजुरा दिल्हे. बाकी रु. १०००० दाहा हजार राहिले ते हाली द्यावयाची आज्ञा. सरकारची मामलतीची बाकी तुम्हाकडे आहे. त्यापैकीं दाहा हजार रुपये मजुरा घेणे म्हणून सनद देणे.
छ २४ जाखर सन इहिदे सितैन पौष वद्य येकादसी.