Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.141: [18-3-1761] This letter from Sirouj mentions how Raghoba was anxious about the Peshwa’s health and what persons were returning to Poona.

Selections from the Peshwa Daftar 2.141

Language
Marathi

2.141

श्री.

पौ छ १० साबान फाल्गून.

शेवेसी लक्ष्मण नारायण सां। नमस्कार विज्ञापना. येथील वर्तमान ता॥ छ ४ साबान मुकाम सिरोज येथे स्वामींचे कृपेकरून सुखरूप असे विशेष, स्वामीनी छ २४ रजबचे पत्र पो तो छ २ साबानी पावले. पावून परम संतोष जाहला तो पत्री काय लिहूं. स्वामीस यासमई जे दुख जाहले आहे तो एक परमेश्वर जाणे. परंतु काय करावे. आता सारांश हेच की चिताचे विवेके करून शांतवन करावे. आणि श्रीमंत राजश्री दादा स्वामीनी एक दोन वेळा पत्रे लिहिली आहेत त्यान्वये जरूर करावे. दादास आपली काळजी बहुतच लागली आहे. ती काय ल्याहावी. दादाचा आग्रह आपण एकवेळ येथे यावे. मग जो मनसबा कर्तव्य तो करावा. श्रीमत सौ मातुश्री पार्वतीबाई वो यावे, हा पोक्त विचार दादानी आपली पालखी व सामान वासुदेवपंत दि॥ विनायक गंगाधर नि॥ त्रिवकराव शिवदेव याज बा॥ छ २ साबानी रवाना केले आहे. सत्वर पावेल. श्रीमंत राजश्री दादा साहेबा बा॥ हरीपंत फडके बाबूराव केशव गणोबा बेहरा या प्रो गेले. बाकी गुरुजीबावा, महादाजीपंत तात्या, महादाजीपंत जोशी, बाळाजीपंत लेले, आम्ही बावाजीपंत व माणकोपंत व केसोपंत या प्रो बरोबर आहो. नारोपंत पालंदे बरे वाटेना सबब पुण्यास गेले. हे विज्ञापना.