Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.142: [27-4-1761] Naro Gangadhar writes from Barhanpur to Bajipant the details of the situation at Delhi after Abdali's departure and about the confiscation of the estates of several Sardars.

Selections from the Peshwa Daftar 2.142

Language
Marathi

2.142

श्री.

चिरंजीव राजमान्य राजश्री बाजीपंत यासी नारो गंगाधर कृतानेक आशिर्वाद उपरी. येथील कुशल चैत्र कृष्ण अष्टमी मु॥ पुणे कुशल असो विशेष. शरीरभावनेचा प्रकार तर आद्यापवर आहे तेच आहे. उपाय करीत आहो. फळदेता श्रीहरी आहे. श्रीमंत राजश्री यजमान स्वामी बुराणपुरास आले. कांही दिवस त्यास्थळीं मुकामि होतील. श्रीमंत नारायणरावजी यास देवी निघाल्या आहेत. उत्तमच आहेत. पाणी घातल्यावर तेथुन निघोन येतील. श्रीमंत राजश्री दादासाहेब पुण्यास दाखल जांले. श्रीमंत मुख्य कांही दिवस गंगातीरी येऊन वास करणार असा मनसबा आहे. मुंज नारायणरावजीची करावी असाहि अर्थ आहे. घडेल ते खरे. वरकड हिंदुस्थानचा अर्थ तर राजश्री गोपाळराव, जानोजी भोसले खेचीच्या पारपत्यास ठेविले. ग्यालियेरी राजश्री मल्हारजी होळकर व नाना पुरंदरे वगैरे मुत्सद्दी सरदार फौज दहापंधरा हजार व श्रीमंत सौभाग्यादिसंपन्न पार्वतीबाई देखील तेथें आजवर होती. सांप्रत श्रीमंत माघारे फिरता त्यास आज्ञा गेली कीं मल्हारबांनीं व बाबुजी नाईक याजसमागे फौज गेली ते सुधां राहावयाची आज्ञा केली. वरकड सर्वानी श्रीमंत सौ पार्वतीबाई सहवर्तमान यावें या प्रों आज्ञा गेली. त्याजवरून तेथून अवघे निघून बाईसह खेचीच्या मुलखांत आली. तेथें श्रीमंत बाईनी आग्रह आरंभिला कीं श्रीमंताचे ठिकाण काय लागले. आज तीन मास मार्ग पाहिला त्याचे सार्थ काय जाले ? आम्हांस तोंड दाखवावयास पुणेयास परिछिन येणे नाहीं; अति दुराग्रह करून उजनीस राहिली. समागमे राजश्री सदासिव बाबाजी व फौज ऐशी ठेऊन वरकड सर्व श्रीमंताकडे येता बुराणपुरावर भेटी होतील. अबदालीकडील मजकूर तर अबदालीच्या मुलकांत सिखांनी व ईराण्यांनी बहुतच दंगा केला. बहुत खराबी याची जाली. त्याजवरून हा तिकडे निकडीने जाणार. छ ११ साबानी निघोन गेला म्हणोन वर्तमान आले. तीन दिवस जात्येसर्मइ दिली लुटून घेऊन गेला. सुजायतदौला नजीबखानहि आपलाले जाग्यास निघोन गेले. प्रस्तूत दिलीमध्यें अलीगोहेर पाछ्जाजादा पटण्याकडे आहे. त्या (चा) लेक श्रीमंत भाऊसाहेबी दिलीमध्यें कायम केला होता त्यासच याणी ठेऊन गेले. वरकड कोण्ही नाहीं. दिलीहि केवळ फकीर होऊन गेली. कांही आब राहिला नाहीं याप्रमाणें वर्तमान आहे. पुढें होईल ते खरें. मल्हार वगैरे याची कस्त मागती दिलीकडे जाण्याची आहे. श्रीमंतानी उजनीस आले तेव्हा सिंद्याच्या कारभाऱ्यापासून पैका अकरा लक्ष रुपये घेतले. कांहीं कापड जवाहीरहि घेतले याप्रमाणे मजकूर त्याचा. यशवंतराऊ पवार वारले. त्याचाही सरंजाम जप्त करविला. ये * * कास सार्थकाची जात चांगले तऱ्हेनें दिसोन आली. पुढें उमेद धरावयास जागा असो रिणानबंध प्रमाणे होईल ते पाहावें. बहुत काय लिहिणे. लोभ असो दीजे हे आशीर्वाद.

[१ कस्त=विचार हेतु.]

Discussed in (1)