Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.143: [May 1761 ?] The writer reprehends the Peshwa's action in attaching the Jagirs of Scindia and Holkar.

Selections from the Peshwa Daftar 2.143

Language
Marathi

2.143

जिलकाद इसने

पुरवणी राजश्री कुकाजीपंतस्वामी सेवेसी. तुम्ही श्रीमंत राजश्री दादासाहेबासी विनंती करून रायापासून आजपर्यंत चालवीत आहेत त्याप्रमाणें पुढें असावें. यांत सरकार कामें फार. व यांच्याहि स्वरूपासी योग्य. स्वामी कार्यावर राजश्री जनकोजी सिंदे यांच्या अशा गती. वरचेवर कुशलतेचीं वर्तमानेहि येतात. असें असोन कांहीहि ध्यानास न आणितां त्यांच्या स्थळासी जाऊन करावयाचें नवतें तें केलें. साहेब चाकरीवर राणोजी बावा, जयापा, दत्तबा कामावर आले तें ध्यानांत आणून खावंदानी सरफराजी करावी ते येकीकडेच ठेऊन नवेच अडकत येते, येणेंकरून राजश्री सुभेदार साहेब म्हणतात कीं चाकरी केल्याचें सार्थक हें. अशा कितेक कल्पना चितांत आणितात. येणेप्रमाणे असताहि सेवा करावयास चुकत नाहींत. फौज इकडे श्रीमंतानी ठेविली नाहीं आणि बंदोबस्त तो पत्रीं आज्ञा येती कीं सर्व हिंदुस्थानचा देखील करावा. गोष्टीनेंच होत नाहीं. तीर्थरूप राजश्री तात्या मथुरेस ठाकूर नवाबासुधां येके ठिकाणींच * * * * * यजमानानी ठेविले * * * * * फौज या प्रांता * * * * * * बंदोबस्त होऊन ये * * * * * पूर्वी येजमानानी विचार केला होता कीं आपणच ग्वाहेर प्रांतीं राहावें म्हणजे आंतरवेदीचा वगैरे मुलकाचा बंदोबस्त होईल. परंतु श्रीमंतानीं इकडे बखेडा केला, याजकरितां येणेस येजमानास जालें. श्रीमंत राजश्री दादासाहेबाचे विचारास आलें तर प्रस्तुतच पर्जन्यकाळाचे अगोदर च्यारपांच हजार फौज या प्रांतांत आलिया उत्तम आहे. बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे हे विनंती.