Selections from the Peshwa Daftar 2.144: [26-5-1761] A mutilated letter; it shows how the Holkar and other Maratha Sardars tried to save the various Maratha stations in Northern regions.
Selections from the Peshwa Daftar 2.144
- Language
- Marathi
2.144
श्रीशंकर.
छ ११ जिलकाद सन
इसने जेष्ट मास
श्रीमंत राजश्री दादा साहेब स्वामीचे शेवेसी.
विनंती सेवक रामचंद्र तुकदेऊ चरणावरी मस्तक ठेऊन सां नमस्कार विनंती विज्ञापना. येथील क्षेम ता॥ वैशाख वद्य ७ सप्तमीपरियेत साहेबांचे प्रतापे करून मु॥ जयेनगर यथास्थित असे. यानंतर बहूत दिवस जाले. आज्ञापत्र सादर होऊन साप्रत आज्ञापत्री साभाल न जाला. याजकरिता बहूत चिंतांतुर असो. तरी सदैव कृपाळू होऊन आज्ञापत्री कुशल वर्तमान लिहून साभाल करावयासी साहेब धणी समर्थ आहेत. वरकड या प्रातींचे वर्तमान तरी पठाण आबदाली लाहोरापलीकड दोन मजली पावलियाचे वर्तमान आले. तेथे छावणी करणार यैसे वर्तमान आहे. दिलीस राजे नागरमल याजकडचे दल मामलतींच्या येवजाचे ताकिदीस पाठविले. ते दिलीस येऊन दाखल जाले आहेत. दिलीचा बदोबस्त नजीबखान यानी पातशाहजाद्यांसी सर्व प्रकारे मायेत घेऊन, बहूत मजबूती व बदोबस्ती करून, फौज पाच सात हजार ठेऊन, आपण आगरियावरी शेह द्यावयासी कूच केले आहे. दबाव जाटावरी टाकिला आहे. मुसेखान बहादरखान बलोचे दोन च्यार हजार फौजेनसी नजीबखान रोहिले यासी दिलीस येऊन सामील जाले आहेत. जाठ सुरजमल यानी आगरियाचा तमाम शेहरपंन्हाचा बदोबस्त करून किलीयासी मोर्चे लाविले आहेत. किला जेर आहे. सरंजाम थोडा बहूत आहे येक हला जाठाचा मारोन काढिली. याजकरिता शहर काही लुटोन घेऊन किल्यास मोर्चे लाऊन बैसले आहे. काही फौज पार बदोबस्तास उतरली आहे. गाजुदीखान मथुरेस आहे. आफज रहिमत यासी पैगाम लाविले आहे. त्याच्या याच्या भेटी होणार यैसे वर्तमान आहे. राजश्री गंगाधरपंत तात्या दोन च्यार हजार फौजनसी जाठापासी आहेत. जाठास प्रस्तुत अगरियाचा घ्यावयाचा मजकूर भारी पडिला आहे. पुढे जो विचार होईल ते लिहित असो. शाहाआलीगोहर पातशाह पाच मजली आलीकड पटणियाहून आला आहे. नवाब सुज्यावतदउले पुढे सामारे आनावयासि लखणेहून गेले अहित. ते दर मजल येऊन दिलीस दाखल होणार येसे वर्तमान. शाहअलम याचा गाजुदीखानाचा विचार सर्व साहेब जाणतच आहे. याजकरिता परसपरे संदेह आहे. पुढे जो विचार ध्यानास येईल ते सविस्तर साहेबाचे शेवेसी लिहित असो. राजे माधोसिगजी याजकडील वर्तमान (या पुढील बंद गहाळ)
[१ गंगाधर यशवंत.]
[१ जवानबख्त. २ शेहरपन्हा=तटबंदी, कोट]
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English