Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.145: [17-6-1761] The writer informs the Peshwa how he was trying to garrison the posts in the Doab in the Maratha interests.

Selections from the Peshwa Daftar 2.145

Language
Marathi

2.145

श्री.

पौ छ १३ जिल्काद

ज्येष्ठ इसने

श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी.

विज्ञाति. कीं येमुनापार अंतरवेदातील मुलुक सरकारचा आहे. त्यास अयुध्येकर व रोहिले व पठाण याची ठाणी बसली आहेत. ते त्याजकडून काहाडून ठाकराकडे द्यावी यैसे त्यास कळले. ते न सोडीत. त्याजवरून राजश्री गंगाधरपंत याची पत्रें आयुध्येकरास व रोहिले व पठाणास गेली कीं मुलुक आम्ही कोणास देत नाहीं. आम्हीच घेऊ. हे वर्तमान छ मजकुरींच जालें. ते सेवेसी विनंती लिहिली आसे. पुढे होईल ते विनंती करूं. कृपा केली पाहिजे हे विज्ञाति.