Selections from the Peshwa Daftar 2.146: [17-6-1761] Hingne writes to the Peshwa about the arrival at Delhi of Yakub Alikhan, Abdali's envoy, to effect a reconciliation with the Marathas.
Selections from the Peshwa Daftar 2.146
- Language
- Marathi
2.146
श्री.
पो छ १३ जिल्काद जेष्ठ इसने.
श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे सेवेसी.
१विज्ञाति कीं, नवाब याकुब अली खानास ताकीद शाहची लाहोरापासून आली की तुम्ही श्रीमंत स्वामीपासी जाऊन सर्वा गोष्टीचा तहरह करून सख्य करून मग दिल्लीस येणे. त्यावरून याकूब आलीखां व तीर्थस्वरूप रा। बापूजी महादेव येथे मथुरेस आले. येथील मंडळी वजीर व ठाकूर सुरजमल वगैरे सर्व मिळून त्यास सांगीतले कीं श्रीमंत स्वामीकडे कोणत्या गोष्टीसाठीं जाता. जे होणे ते येथेंच होईल. या गोष्टीवरून येथे राहिले. वीस रोज होत आले, परंतु काम कांहींच जाले नाहीं. बखेताच राहिला. याकूब आलीखां आज उदईक दिल्लीस जाणार. आलीगौहर फौजेसद्द वर्तमान वारानसीस दाखल जाले. मजल दर मजल दिल्लीस येतात. नजीबखां बागपतावर आहे. वजीराचे व जाटाचे मानस आहे कीं आलीगौहरासी सख्य करावे. या विचारांत आहेत. शाह येरावती नदी लाहोरा पलीकडे आहे, तेथवर जाऊन पोहचला. पुढे चालला जातो. सो कळावे म्हणून विनंती लिहती आहे. मागाहून वृत होईल ते सो। लिहू. याकूब आलीखा दिलीस जाऊन स्वामीच्या पत्राची मार्गप्रतीक्षा करील. जेव्हां आज्ञापत्र येईल तेव्हा सो येऊन पोहचल. श्रुत होय कृपा केली पाहिजे हे विज्ञाति.
[१ पत्र हिंगण्यांचें.]