Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.18.2

Selections from the Peshwa Daftar 2.18.2

Language
Marathi

2.18.2

हे पारहि देशास जातील मुलुक*राहील. या भावे उणियारवाले सरदारसिंग या * * * * मामलत तेरा लक्षावर ठहराऊन निशा घेऊन जागा त्यास दिधली. परंतु कांहीं ताकद सरदारसिंगांत न ठेविली. घर हवेली सर्व खोडून खराब करून जागा सोडली. हत्ती एक व पालकी घोडा वस्त्रे सिरोप दिधला. हेच निरोपिले जे, फौज सर्व घेऊन मालव्यात जा. याप्रकारे सांगून कनीराम दिवाण समागमे हजार दोन फौज देऊन नेणव्यावर तोफखान्यासहित पाठविले. व ताकीद हेच केली कीं, पंत हा सलुकाने जागा रिकामी करून देतील तर सरंजामानिशी त्यास चंबलपार करून देणे. न मानतील तर तोफखाना लावून मोरचे बंदी करून घेणे. त्यास राजेश्री कनिराम येऊन नेणव्यास लागले व मागून रायेसिंग घोडचढाहि तनि हजार स्वारानशी नेणव्यावरं येऊन पावला. तोफा लाविल्या, व मोरचे कायम केले; तळे फोडले; उपद्वाप अतिशय मांडला. यास रा। सदाशिव गोपाल सिंघाकडील कमाविसदार यानी मुलकाचा जवाबसाल लाऊन ठेऊन राजेश्री सुभेदार यासी पत्रें लिहिलीं, पाठविलीं कीं, धणी उपार (उपकार) करतील तर सेवक * * * राहील व खर्चाचाहि परामर्श करावा * * * जे राहतील त्यावरून सुभेदार यानीं ताकीद हेच लिहिली की, पाहा उतावळेपणाने बेहिमत होऊन जागा न सोडणे. कदाचित सोडाल तर आपली स्थिति उत्तम विचारणे आहे. दसऱ्याचे मुहुर्ते कूच करून टाकोटाक येतो व खर्चास वीस हजार रुपये देविले. पंत मजकुरानी आजपावेतोहि मथऊन नेणवे राखिले आहे व मोरचेहि जवळच जाऊन पावले आहेत. याउपरी चालीचे बळ न व्हावेसे आहे. माधोसिंग यानी कोटेकर महाराव यासी बहुतकरून सिष्टाचार लाविला जे आम्ही तुम्ही एकवचने चालावें व सर्व रजपुतानी आपली आपली जमियेत करून जागा रखून मालव्यात जाऊन बखेडा करावा; म्हणजे आपले आपणच दक्षणी सलुक करतील व पेशकदमी करणार नाहींत. दक्षणेतच फिसाद वाढला आहे.