Selections from the Peshwa Daftar 2.18.3
Selections from the Peshwa Daftar 2.18.3
- Language
- Marathi
2.18.3
त्यास आपलीच पडली तेव्हां या प्रांती येणार नाहींत; व शुजाउदवला शाहजादा यास म्हणजे अलीगोहरास काल्पीचा घाट उतरून झांसी प्रांते देऊन तिकडील उंडेँछे व दतिया व बुंदेले व नरवरकर हे सर्व राजे समागमे घेऊन येतो म्हणून आम्हास ताकीद पत्रे पाठविलीं. सर्वास म्हणजे सर्व लहान थोर बादशाही बंदेयासीहि ताकीद पाठविली आहे. त्यास विदीत हेच कीं, बादशाही चाकरानीं एकवाक्ये होऊन बादशाही चाकरी करून दाखवावी. यातच परिणामी उत्तम एकनिष्ठता दिसेल. याशिवाय विचार दुसरा विचारल्या तुरुक मुळुक सोडवितील. ज्यानी दक्षण्यास सिकस्त दिधली ते वरकडास केधवां न देतील? यास्तव सर्वांचे हिताची गोष्ट जाणून आम्हीहि फौजबंदी करून आलो आहो. जर तुम्ही सर्व रिफाकत द्याल तर बादशाही चाकरी करून दाखवू; म्हणजे आपला नकशाहि तुरकाजवळ वाढेल व सर्व उमदिगीस पाऊं. हाच विचार नाना प्रकारे भले मनुष्य पाठवून बिंबविला. त्यास कोटेकर माहाराव यानी दुरवरी दृष्टि देऊन माधोसिंगाचेच समाधानरुप आजपावेतो लावून घेतले. लौकिकी एकवाक्यता मात्र जाणविली. हा सर्व प्रसंग गोपाळराम व्यास याचे मध्यंस्तिने होताच आख्येरा दिवाणाचा निश्चये सर्व प्रकारे आपले पायासी. यांनों राजश्री सुभेदार यांचे मार्गप्रतिक्षेची वाट पाहिली जे, जर विजयेदशमी करून राजश्री सुभेदार इंदुराहून या प्रांते येतात किंवा परभारे देशास जातील. जर देशास जातील तर आम्ही लाचार आहो. माधोसिंगाचेच मरजीनुरुप एकास दाहा पंधरासे रावतानिशीं भले मनुष्य शामील फौज माधोसिंगाचे करून देऊन मग ते जे कर्तव्य करो. खासा जावे हे तर विदीत नाहीं. याप्रकारे महारावजीस बोध करून लाऊन घेतले. सुभेदाराची मार्गप्रतिक्षा केली. त्यास श्रीसुभेदारजी तर उतावलीनेच येतो परंतु गौतुमाबाईचा प्रकार वीस दिवस अवरोधाचा जाहला.