Selections from the Peshwa Daftar 2.18.4
Selections from the Peshwa Daftar 2.18.4
- Language
- Marathi
2.18.4
तथापि दसरियाचे महुर्ते कूच केला. ते वीस हजार व मातबर तोफखान्यासहित येऊन मकुंददन्यांतून पाचा कोसावर येऊन पावले; व नेणवेकरास खातरजमाची पत्रे पाठविली जे आलो, जागा सांभाळून राहणे. दुसरे कोटेकराम लिहिले जे जर लवकर येऊन आपले सरहदेवर भेटताच कराराप्रमाणे ऐवज पावतां तर तुमचे मुलकांत उजाड न होऊन देता. तिसरे मुक्कामाने चंबलपार होऊन जाऊ. नाहीं तर मुलुक उजाडला म्हणून नालीस न करणे. या प्रकारे साफ पत्रे पावली. तत्क्षणीच महारावजीनी राजश्री आखेराम दिवाण यासमागमे हजार राऊत देऊन राजश्री सुभेदाराकडे छ १७ मजकुरी भेटीस पाठविले. दिवाण मजकूर थोडे बहुत साजसरंजाम फारफरमSubject: Re: [Historical-Texts] Re: Transcribe this scan