Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.21: [26-9-1750] This letter describes the crushing defeat inflicted by the Rohillas upon Safdarjung, who being wounded was removed from the battle-field in an unconscious state and who was consequently believed at the time to have been killed.

Selections from the Peshwa Daftar 2.21

Language
Marathi

2.21

श्री.

श्रीमंत राजश्री सुभेदार साहबांचे सेवेसी.

पोष्य पंडे मुरारजी व नरेश्वर कृतानेक आशीर्वाद विनंती उपरी. येथील क्षेम तागाईत अश्विन शुद्ध ७ सोर्मेवासर जाणौनु स्वामी यानी आपुलें स्वानंद लेखण आज्ञा करीत गेले पाहिजे ।विशेष. बहुत दिवस स्वामीकडील साकत्यवृत्त लेखण करून सेवकाचा परामृष न केला यास्तव ।चित्त चिंतनीं आहे. जेव्हां दर्शणाचा लाभ घडेल तो सुदिन असें. यानंतर, हस्तनापुर प्रांतींचें वर्तमान तर पठाणांनीं बहुत धूम उठविली. त्याजवर मनसुरअल्लीखानानें आपला बकसी नवलराये वीस हजार फौजेनसी पाठविला. लढाई जाली. बक्षीची फौज गारत जाली. मागाहून येक चेला दाहा हजार फौजेनें पाठविला, तोही शिकस्तीत आला. तेव्हां मनसुर-अल्लीखान खुद व जमियेत घेऊन पठाणावर गेलेत. हरोली, सुरजमल जाट व हेमराज बक्षी निसबत इसरीसिंग यसें उभयतां हरोल होते. परस्परें युध्यप्रसंग मातबर जालेंच. परंतु जय पठाणास आला ; आणि मनसुरआलीखान गारत जाला. याप्रकारचें वर्तमान जालें. दुसरें सलाबतखान जयनगर प्रांतीं आला होता. त्यासी इसरीसिंगासी सुला जाला. सलाबतखान दिलीस गेला व ईसरी-सिंग जेपुरास आला व बखतसिंग नागोरास गेला; व रामशिंग मिरचेस गेला. ऐसें वर्तमान जालें. आपणास कळावें म्हणऊन लिहिलें असें. सेवेसी विदित होय. आपण सेवक पदरींचे असों. आगमनाची प्रतिक्षा चातकन्यायें करितों. दर्शनाचा लाभ घडेल तो सुदिन असें. विशेष काये लिहिणें कृपा वृध करीत जाणें. ।विशेष काय लिहिणे हे विनंती.

[१ सौम्यवासरः बुधवार.]