Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.22: [2-10-1750] Malharrao Holkar urges the Peshwa to despatch Jayappa Sinde to the North. The latter was engaged in the fight against the Pratinidhi at Sangola. The letter breathes a spirit of renewed vigour and ambition infused by the Peshwa, now freed from the shackles of a wavering master.

Selections from the Peshwa Daftar 2.22

Language
Marathi

2.22

श्री.

राजश्री......पंत प्रधान साहेबाचे सेवेसी.

छ श्रीमंत सकल गुणाळंकर्ण आखंडीत लक्ष्मी आलंकृत राजमान्य श्रो म्लारजी होळकर कृतानेक दंडवत विज्ञापना. येथील कुशल आस्वीन शुध त्रयोदसी मुकाम कसबे थालनेर पावेतो साहेबाच्या कृपावलोकनेकरून यथास्थित असे विशेष. कृपा करून आज्ञापत्र पाठविले ते पावोन बहुत संतोश जाला. प्रस्तुत कोठे आहां, फौज कितेक जमा जाली, पुढे इंदुरी कितेक दिवस लागतील, मनसबा करावयाचा कोणता योजिला, ते सविस्तरें वरचेवर लिहीत जाणे, म्हणून आज्ञा केली. त्यास वाफगावीहून जलदी करून निघालों कीं फौज जमा करून न्यारी राजकारणे राखून उपयोगी ते करावे. यांस्तव त्वरेकरून खानदेश प्रांती आलो. राजश्री जयापा याची मार्गप्रतिक्षा करून मुकाम जाले. तो वर्तमान आले कीं रा। येमाजी सिवदेव याच्या पारपत्यास राजश्री जयापास तिकडे जावयास आज्ञा केली. तेव्हा ते आलिया पुढे जावे. याजकरितां मुकाम करून शेवेसी विनंती पत्रे पाठविली. त्याची आज्ञा केली की, दसरीयास त्याजला निरोप देऊन रवानगी करितो. दसराहि जाला. त्याची रवानगी इकडे सत्वर केली पाहिजे; व सरकारची पथके इकडे पाठवणार तेही पाठवावी. आमचीहि फौज जमा होत आली. वरचेवर लोक येतात. आलीकडील मालवे प्रांतीची कामे करावी. जमीदार गिरासे याजला नीट करावे. तो मागून हेहि येतील. येकत्र होऊन पुढे मनसबा करणें तो करावा, यैसे कितेक प्रकारे लिहिले होते. त्यास आलिकडील कामे सहजात होतील. हिंदुस्थानातील विचार मनास आणिला पाहिजे. तरी राजश्री जयापा यांची व पथकें पाठवण्याची त्याची रवानगी सत्वर जाली म्हणजे येके जागा होऊन न्यारी राजकारणे मनास आणून लाभालाभ विचारून करणे ते सर्व साहेबाच्या प्रतापे करून होतील. दिलीकडील वजीर खासा फौजसुधा तयार होऊन फरोखाबादे-समीप गेले. तिकडून रोहिले पठाण येकत्र होऊन चालून आले. याचा त्याचा विसा कोसाचा तफावत आहे. मुकाबला होणार, यैसे वर्तमान आहे. आपणाकडील फौज न्यावी, जैसा त्याचा मनोगत विशेष आहे. तैसेच राजे रजपुत व बकसी येकत्र जाले, त्यांचीहि गुंज बलावणार. ये गोस्टीस आपला जमाव फौज येकत्र होऊन उपयोगी मनसबा तिकडे डोल देऊन करणे ते करावे. गुजराथ प्रांते जावयाचा मनसबा तोहि आधी करणे, कार्याची गोस्टी आहे. आवघें येकत्र जालिया उतम दिसेल ते करून. परंतु सर्व फौज येकत्र जमा असली आणि सर्वांच्या राहावर जवळ असिलें म्हणीजे जेथे लाभकाळ दिसेल तिकडेच राजकारण करून. येसा विचार आहे. यास्तव साहेबीं वारंवार आज्ञापत्रें व फौजाची रवानगी करावी. शेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.