Selections from the Peshwa Daftar 2.23: [8-10-1750] Malharrao Holkar sends information to the Peshwa about the reverse that the Vazir had sustained at the hands of the Rohillas.
Selections from the Peshwa Daftar 2.23
- Language
- Marathi
2.23
श्री.
राजश्री......पंतप्रधान साहेबाचे सेवेसी
श्रीमंत सकळ गुणाळंकर्ण अखंडितलक्ष्मी आळंकृत राजमान्य...स्नो मल्लारजी होळकर कृतानेक दंडवत विज्ञापना. येथील कुशळ आस्विन वद्य पंचमी मुकाम कसबे सेंधवे साहेबाच्या कृपावलोकनेंकरून यथास्थित आसे विशेष. थालनेरच्या मुकामीहून शेवेसी विनंती पत्रें पाठविलीं आहेत. प्रविष्ट होऊन आर्थ श्रुत जाला असेल हिंदुस्थानाकडील वर्तमान पठाणाही नवलराय याजला मारिलें, त्यावरून बळावलेच होते. त्यास नवाब मनसूरआलीखान यानी तमाम पातशाही तोफखाना रिसाला व आमीर तैनातीस घेऊन पठाणांवर चालोन गेले. कमरऊदीखान याचा लेक मिरबाका व सेरजंग आणखी उमराव दिलीचे समागमें घेऊन गेले. कुंवर सुरजमल जाट हारोळींस होते. राजे ईश्वरसिंग याजकडील हेमराज बक्षीहि पांवा हजारानसी सामील होते. त्यास पठाणहि गंगेच्या दक्षंण तीरींच होते. याचा त्याचा मुकाबला महूसमसाबादेवरते बारा कोस सोरामच्या घाटानजीक सिताकुंडापासीं जाला. छ २१ सवाल यां याचा त्याचा युद्ध प्रसंग प्राथाकाळापासून तिसरा प्रहर पावेतों तोफखाना बाण जेजाळाचे जालें. नवाबाच्या हरोलीस जाट होते. पहिले दिवशीं जाटाचें कामकाज जालें. त्यामुळे नवौजीस होऊन पुढें जाले. तिकडे पठाणाही बेहडांचे मोर्चें धरून मार देत होते. यसें तोफखानियाचें युद्ध जालें. तेव्हां पठाणांही निवड करून पायेउतारा होऊन सा सात हजारानसी चालोन घेऊन जाटासी गांठ घातली. बाण बहुत, तेणेंकरून आधी मार केला; मग तरवारेचें जुंज जालें. तीन च्यारसें जाटाकडील तेथें कामास आले. तैसेच पठाणाकडीलहि तीनसें कामास आले. ते समईं जाटानी सिकस्त खाऊन निघाले. पुढें टोपीवाले होते. त्यांची गांठ पडली. टोपीवालियानी कांहीं दम धरिला नाहीं. घर सोडून वाव दिला. नवाबाचें लष्कर पाठीमागें होतें. त्याचा पळ सुटला. टोपीवालेहि पळों लागले. खासी फौज नवाबाची त्यास पठाणांसी युद्ध जालें. ते समयीं नवाबाकडील हिसाबखान मातबर होता, तो कामास आला. तैसाच इस्मालखान चेलाहि कामास आला. आणखी महमद आदाखां व महमद जमाखां व घासडेकर बहादुरसिंग पिता पुत्र व खान दैजराचा लेक व चूडामण जाटाचा पुत्र महकुमर्सिग व बलोच दोन सरदार व बळुजाट व त्याचा पुतन्या जैसे कामास आले. आणखी लोक बहुत मारले गेले व घायाळ जाले. पठाणाही निकट बहुत केली. नत्राबाची फौज अस्ताव्यस्त जाली. तेव्हां नवाब हतीवरून उतरून घोडीयावर बसले. पठाणाही दाटी करून खासा नबाबास तीर व गोळी लागोन तिसरे तरवारेच्या जखमेकरून तेथेंच कामास आले. मिरबाका व सेरजंग दोन्ही बाजूस दोघे होते. ते फितव्यांत होते. त्याजकडे गोळी बाण चालली नाहीं. नवाब कामास येतांच तेथून पळोन दिलीस आले. सुरजमल जाट व हेमराज बर्क्सी हेहि निघोन जरारे येमुना उतरोन आले म्हणतात. अद्यापि ठीक नाहीं. पठाणाची फते जाली. तमाम लष्कर तोफखाना त्यानी लुटून घेतला. उमदे उमदे लोक कामास आले. नवाबाकडे फौज भारी होती; परंतु येकदील नवते. फितुरामुळे यैसी गोष्टी जाली. प्रस्तुत अवघी इमारत वजिरावरच होती. आमीर थोर होता. पुढें पाहावें, पठाण दिलीस येऊन रुजू होतात कीं त्याच्या मुलुकांत सिरून बंदोबस्त करितात. याउपरी वजिरी कोणास होते. सलाबतखान आजमेरीस होते, तेही दरकूच गेले. राजे ईश्वरसिंग जैपुरास दाखल जाले. रामसिंग मेडत्यास आहेत. दिलीकडील कारभार अवघा नवा होणार. कोणे प्रकारें बंदोबस्त होतो, पठाण पुढें काये करणार, जैसें वर्तमान येईल ते सेवेसीं लिहून पाठवूं. याप्रसंगीं आपली फौज पुढें शहास असावी. राजश्री जयापाचीं व पथकें आणखी रवाना करावयाचीं त्याची रवानगी सत्वर केली पाहिजे. आवघे येके जागा होऊन पुढें गेलिया जैसा जैसा विचार मनसबा उपयोगीं देखूं तो करून. *सेवेसी लिहून पाठऊ सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
[१ आघाडी.]
[२ तारीफ.]
[३ अडचणीची जागा.]
[seal: मोर्तब सुद.]
[* याठिकाणीं मल्हाररावाचा शिक्का आहे.]
[१ सफदरजंग.]