Selections from the Peshwa Daftar 2.26.4
Selections from the Peshwa Daftar 2.26.4
- Language
- Marathi
2.26.4
तरी तुम्हांस सहा हजार रुपये घेऊन, गढी गुजरास घ्यावयासी प्रयोजन काये ? या उपरी सहा हजार रुपये दलेलसिंगाचे माघारे देऊन, मौजे अंबरोलची गढी खालीं करून चोपदारांचे हवालीं करणें. दरबारीं बोलतां एक, त्याप्रमाणें वर्तत नाहीं हें गोष्टी उत्तम नाहीं, म्हणोन विशार्दें लिहिलें. याप्रमाणें श्रीमंतांनीं व राजश्री बाबांनीं व राजश्री रामचंद्र बाबांनीं फजीत करून लिहिलें. यैसीयासी विठ्ठल पंतांनीं जें सांगितलें असेल तें प्रमाण. ते सरदार आहेत. स्वामींपाशीं सांगितलें असेल तें प्रमाणच सांगितलें असेल. आम्ही सहा हजार रुपये घेऊन, गढी दिल्ही असिली, अगर एक रुपया घेऊन दिल्ही असिली, अथवा फुका तन्ही दिल्ही असिली तरी हे गोष्टी तिलतुल्य जाली; तरी या सरंजामांतून स्वामींनीं दूर करावें, आणि सरकारचे गुन्हेगार व परस्परें चोपदार पातशाई लिहितील सेवेसी व सरकारचे जासूद जोडी हुजरून आली आहे ती सांगेल. आम्ही देशास गोलियाउपरी विठ्ठलपंतांनीं दलेलसिंग गुजरास आम्हांकडून फोडून, त्यांस पालखी देऊन, आमचे गांव बळाऊन, त्यांत नवी गढी बांधोन, त्यांस पाठीशीं घातला. त्यास आम्हांकडील बाबूराऊ कांहीं बोलावयासी लागले तरी यांची पाठ त्यांस जबरदस्त. विलाज नाहीं. आम्ही दूर देशीं. विठ्ठलराऊ संनिध. त्याहीमध्यें दरबारीं त्यांची मातबरी. ते जें जें सांगतील तें प्रमाणच आहे. आमची मातबरी सर्व स्वामींचे पाये आहेत. विठ्ठलपंत देशीं येऊन अदावत आम्हाविशीं नाना प्रकारची करीतील, हे विनंति मी पूर्वी सेवेशी केलीच होती. स्वामींनीं अश्वासन दिल्हेंच होतें कीं, तुमचा त्यांचा हमेशा कजिया आहे, आम्ही कांहीं त्यांचें सांगवीवरी जाणार (नाहीं,) यैसें अश्वासन दिल्हें आहे. त्याजवरून आम्ही बेफिकीर आहों.