Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.28: [10-2-1751] Ramaji Anant Dabholkar, who replaced Ramchandra Baba in the Diwanship of the Scindias, accompanied Jayappa to Delhi, whence he writes this letter.

Selections from the Peshwa Daftar 2.28

Language
Marathi

2.28

श्री

सेवेसी रामाजी अनंत कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील क्षेम ता॥ छ २४ रविलावल यथास्थित असे विशेष. स्वामीची आज्ञा घेऊन आलो त्या दिवसापासून आज्ञेप्रमाणे राजश्री जयाजी सिंदे आपा यांचे आज्ञेप्रमाणे वर्त्तोन सुखरूप आहों. येथील सविस्तर अर्थ राजश्री आपासाहेब्री लिहिला आहे, त्याजवरून विदित होईल. वजिराकडील वकील राजे जिगलकिसोर व दिवाण रामनारायेण आले आहेत. बोली होत आहे. राजश्री मल्हारजी बाबाची मर्जी वजिराकडेच जाण्याची दिसते. बोली ठीक जाहाल्यावरी जातील. राजश्री आपा व राजश्री सुभेदार येकाचित आहेत. सेवेसी कलावें याजकरितां विनंती लिहिली आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञप्ति.