Selections from the Peshwa Daftar 2.31.5
Selections from the Peshwa Daftar 2.31.5
- Language
- Marathi
2.31.5
सेवक बाबूराव विष्णू साष्टांग नमस्कार विनंती उपरि. येथील वर्तमान तागायत माघ शुध ७ मुकाम जयनगर लस्करांत सुखरूप आहों. तुम्हांपासून स्वार जाहलों ते मजल दरमजल मार्गशीर्ष शुध १ दाखल लस्कर नजिक मुकुंदवारी येक मजल तेथें राजश्री सुभेदारांच्या व तात्यांच्या भेटी जाहल्या. पत्रें श्रीमंताची व आपलीं दिधलीं. वर्तमान साद्यंत सांगितलें. त्याणी उत्तर दिधलें कीं, येथें वराता अलाहिदा आल्या आहेत. विष्णू महादेव येक लाख पंधरा हजाराच्या आहेत. व अंताजी शंकर दोन लाख व आणखी साठी हजाराच्या यैशा वरात परस्परें आम्हांवरी आल्या आहेत. मागती तुम्हांकडे यैवज देविला. आम्ही सांगितलें कीं, तीन लाख रुपये आम्ही भरून दिधले. आम्हावरी वराता या यैवजीं पंतावरी केल्या. त्याणी यैवज पंतापासून घेतला. याजकरितां तुम्हापासी आम्हांस पाठविलें. ते म्हणो लागले कीं उत्तम, यैवज तुम्हांस देऊं, नेनवेपावेतो चला, तेथें तुमची वाट करून देऊं. यैसे सुभेदार आपले रुबरू बोलिले. मग मजल दरमजल मार्गशीर्ष शुध ११ येकादशीस नेनवे यास आले. तेथें मोर्चे लाविले. तिसरे दिवशीं येऊन भेटले. ठाणे याच्या हवाळा केलें. तेथें बाईको राजियाची होती, ती बहिर काढून दिधली. तेथें ठाणे याणी आपले बसविले. परगणा मातबर आहे. बुंदीकर कमाविसदार बाळाजी शामराज यांच्या हवाळा केलें. दाहा रोज मुकाम होता. तेथेंहि दोन तीन वेळां हटकिलें. परंतु यैवज नाहीं. कमाविसदारापासून रसद घेऊन द्यावी तों कमाविसदाराचेच रुपये दोन दोन लाख निघतात. याजकरितां आम्हांस म्हणाले कीं, तुम्हास येवज........जैनगर प्रांतीं गेल्यावर देऊं........नेनवे याहून मजल दरमजल जैनगरास चालिले. दोन तीन मजली जैनगर राहिलें, तों राजियास वर्तमान कललें.