Selections from the Peshwa Daftar 2.31.6
Selections from the Peshwa Daftar 2.31.6
- Language
- Marathi
2.31.6
त्याणीं वकील व याचा..........गणेश मालीं राजे यानें दोन लाख रुपये देऊन पाठविलें. त्याची भेट झाली. सुभेदार इतराज जाहाले. कांहीं केल्या न यैकत. मजल दरमजल चालिले. वकिलांही लेहून पाठविले कीं हे यैकत नाहीं. केशवदास मारिला त्याचा सूड आपणांस घेणें आहे, यसें लिहून पाठविलें. राजियाचे कारभारी जुने घरीं बैसले होते. हरगोविंद व विद्याधर दोघे राजियापासीं गेले कीं सुभेदार येतात. फौज आपली आणावी, बाहिर जाऊन लढाई करावी, अगर गावांतून लढाई करावयाची असेल तरी मोर्चेबंदी करावी. तोफा बुरजेबुरूज ठेवावी, यसें उभयेतानी सांगितलें. त्याजवरी इतराज राजा जाहला. त्याचे कारभारी नवे माहावत व येक नाहावी त्याजला बोलाविलें कीं, सुभेदाराच्या चित्तांत कीं केशवदास आपण मारिला, त्याचा सूड घेणार. याजकरितां तुम्ही सुभेदारापासीं जाऊन गोष्टमार्त करणें; च्यार पांच लाख रुपये मागतील तर देऊन वाटेस लावणें, यसें दोघां कारभारी यासी सांगितलें. कारभारी म्हणाले कीं आम्ही येकंदर न जाऊं. आम्हास तो मारील. तुम्ही आपले हाते मारणें, परंतु आम्हांस तिकडे न पाठवणें. मग राजा उगाच राहिला. संध्याकाळ जाहला. वर्तमान यैकिलें कीं सुभेदार येथून दाहा कोसावर आले. खिजमतदारास सांगितलें कीं काला नाग जित आणवणें व सोमलखार घेऊन येणे. औषध करणे आहे. त्याणी आणून दिल्हें. दोन प्रहर रात्रीस जहर राजे याणे घेतलें. नाग अंगास डसविले. पहाटे ईश्वरसिंग राजा याचा प्राण गेला. तिघी बाईकानी जहर घेतले. व येक कलावतिण इणे जहर घेतलें. यैसे चार बाईका व राजा यैसे जहर घेऊन प्राण दिधले. हें कोणास शहरांत ठावकें नाहीं व कारभारी यांसीहि ठाऊक नाहीं. येक खिजमतगारास मात्र ठाऊकें होतें. पौष वद्य १२ सुक्रवार प्रहर दिवसा फौज खंडेराऊँ व गंगाधरपंत तात्या (चंद्रचूड) नगरावर गेले.