Selections from the Peshwa Daftar 2.31: [21-2-1751] An important news-letter addressed to Govindpant Bundele by his accountant Baburao Vishnu from the camp of Malharrao Holkar and Jayapa Scinde in the vicinity of Jaipur. The letter mentions the circumstances of the suicide of Ishwarsing and the horrid murders perpetrated upon the Maratha forces by or
Selections from the Peshwa Daftar 2.31
- Language
- Marathi
[21-2-1751] An important news-letter addressed to Govindpant Bundele by his accountant Baburao Vishnu from the camp of Malharrao Holkar and Jayapa Scinde in the vicinity of Jaipur. The letter mentions the circumstances of the suicide of Ishwarsing and the horrid murders perpetrated upon the Maratha forces by or
2.31.1
श्री
2.31.2
पत्र आलें त्याची नकल.
2.31.3
श्रीमंत राजश्री गोविंदपंत
2.31.4
स्वामीचे सेवेसीं
2.31.5
सेवक बाबूराव विष्णू साष्टांग नमस्कार विनंती उपरि. येथील वर्तमान तागायत माघ शुध ७ मुकाम जयनगर लस्करांत सुखरूप आहों. तुम्हांपासून स्वार जाहलों ते मजल दरमजल मार्गशीर्ष शुध १ दाखल लस्कर नजिक मुकुंदवारी येक मजल तेथें राजश्री सुभेदारांच्या व तात्यांच्या भेटी जाहल्या. पत्रें श्रीमंताची व आपलीं दिधलीं. वर्तमान साद्यंत सांगितलें. त्याणी उत्तर दिधलें कीं, येथें वराता अलाहिदा आल्या आहेत. विष्णू महादेव येक लाख पंधरा हजाराच्या आहेत. व अंताजी शंकर दोन लाख व आणखी साठी हजाराच्या यैशा वरात परस्परें आम्हांवरी आल्या आहेत. मागती तुम्हांकडे यैवज देविला. आम्ही सांगितलें कीं, तीन लाख रुपये आम्ही भरून दिधले. आम्हावरी वराता या यैवजीं पंतावरी केल्या. त्याणी यैवज पंतापासून घेतला. याजकरितां तुम्हापासी आम्हांस पाठविलें. ते म्हणो लागले कीं उत्तम, यैवज तुम्हांस देऊं, नेनवेपावेतो चला, तेथें तुमची वाट करून देऊं. यैसे सुभेदार आपले रुबरू बोलिले. मग मजल दरमजल मार्गशीर्ष शुध ११ येकादशीस नेनवे यास आले. तेथें मोर्चे लाविले. तिसरे दिवशीं येऊन भेटले. ठाणे याच्या हवाळा केलें. तेथें बाईको राजियाची होती, ती बहिर काढून दिधली. तेथें ठाणे याणी आपले बसविले. परगणा मातबर आहे. बुंदीकर कमाविसदार बाळाजी शामराज यांच्या हवाळा केलें. दाहा रोज मुकाम होता. तेथेंहि दोन तीन वेळां हटकिलें. परंतु यैवज नाहीं. कमाविसदारापासून रसद घेऊन द्यावी तों कमाविसदाराचेच रुपये दोन दोन लाख निघतात. याजकरितां आम्हांस म्हणाले कीं, तुम्हास येवज........जैनगर प्रांतीं गेल्यावर देऊं........नेनवे याहून मजल दरमजल जैनगरास चालिले. दोन तीन मजली जैनगर राहिलें, तों राजियास वर्तमान कललें.
2.31.6
त्याणीं वकील व याचा..........गणेश मालीं राजे यानें दोन लाख रुपये देऊन पाठविलें. त्याची भेट झाली. सुभेदार इतराज जाहाले. कांहीं केल्या न यैकत. मजल दरमजल चालिले. वकिलांही लेहून पाठविले कीं हे यैकत नाहीं. केशवदास मारिला त्याचा सूड आपणांस घेणें आहे, यसें लिहून पाठविलें. राजियाचे कारभारी जुने घरीं बैसले होते. हरगोविंद व विद्याधर दोघे राजियापासीं गेले कीं सुभेदार येतात. फौज आपली आणावी, बाहिर जाऊन लढाई करावी, अगर गावांतून लढाई करावयाची असेल तरी मोर्चेबंदी करावी. तोफा बुरजेबुरूज ठेवावी, यसें उभयेतानी सांगितलें. त्याजवरी इतराज राजा जाहला. त्याचे कारभारी नवे माहावत व येक नाहावी त्याजला बोलाविलें कीं, सुभेदाराच्या चित्तांत कीं केशवदास आपण मारिला, त्याचा सूड घेणार. याजकरितां तुम्ही सुभेदारापासीं जाऊन गोष्टमार्त करणें; च्यार पांच लाख रुपये मागतील तर देऊन वाटेस लावणें, यसें दोघां कारभारी यासी सांगितलें. कारभारी म्हणाले कीं आम्ही येकंदर न जाऊं. आम्हास तो मारील. तुम्ही आपले हाते मारणें, परंतु आम्हांस तिकडे न पाठवणें. मग राजा उगाच राहिला. संध्याकाळ जाहला. वर्तमान यैकिलें कीं सुभेदार येथून दाहा कोसावर आले. खिजमतदारास सांगितलें कीं काला नाग जित आणवणें व सोमलखार घेऊन येणे. औषध करणे आहे. त्याणी आणून दिल्हें. दोन प्रहर रात्रीस जहर राजे याणे घेतलें. नाग अंगास डसविले. पहाटे ईश्वरसिंग राजा याचा प्राण गेला. तिघी बाईकानी जहर घेतले. व येक कलावतिण इणे जहर घेतलें. यैसे चार बाईका व राजा यैसे जहर घेऊन प्राण दिधले. हें कोणास शहरांत ठावकें नाहीं व कारभारी यांसीहि ठाऊक नाहीं. येक खिजमतगारास मात्र ठाऊकें होतें. पौष वद्य १२ सुक्रवार प्रहर दिवसा फौज खंडेराऊँ व गंगाधरपंत तात्या (चंद्रचूड) नगरावर गेले.
2.31.7
सुभेदार व बुनगें तीन कोसावरी मागें राहिले. दोन प्रहर पावेतों कोण्ही गोले टाकिले नाहींत. फौज बाहिर उभी. कारभारी राजीयासी गेले कीं माहाराज फौज बाहेर येऊन लागली, आपण अजून निजलेसे काय ? म्हणून उठवावयास लागले तों खिजमतगार म्हणाला कीं माहाराजानें यसें कर्म केलें. मग आकांत शहरांत जाहला. जुने कारभारी हरगोविंद व विद्याधर याणी थां बाधांब शाहरांत करून मग बाहिर भेटीस आले. उभयतांस भेटले. सुभेदारासहि सांगोन पाठविलें. तिसरा प्रहरास कूच करून शाहराजवळ फौज सुधां राहिले. पाहावयास माणसें पाठविलीं, तों खरेंच जाहालें. मग याणी चौकीया दरवाज्यावर जागजागी ठेविलें. राजमंदिरीं चौकी ठेविली. राजेयाचा मुरदा च्यारी प्रहर दिवसपर्यंत होता. मग सुभेदारानी कारभारी आपले मातबर दोघे पाठऊन व सेला पाठऊन अगिनडाव दिधलां. तीन बाईका व येक कलावंतीण यसें जलालें. दुसरीया दिवशीं राजेयाचे हवेलीतून चौक्या बसविल्या आणि इकड़े माधोसिंगास सांडणी-स्वार पाठविला. पत्र पाठविलें कीं जलदीनें येऊन पोहचणें आणि इकडे हरगोविंद व विद्याधर सुभेदारापासीं येऊन बहुत रदबदल करून शहरचा व राजियाचे आपेश तुम्ही माथां न घेणे, राज्य भारी आहे, याची स्थापना करावी. मग सुभेदाराचे चितास येऊन जागजागा चौकिया बसविल्या होत्या. खंडणीचा करार करून चौक्या उठविल्या. जैसा करार मदार होऊन च्यार रोज जाहले. राज्याची येक राणी व वीस कलावंतीणी तेहि सती पडल्या. रुपयाच्या वसुलास लागले. तो माधोसिंग पंधरावे रोजीं आला. सुभेदार पुढें जाऊन भेटले. येक हतीवर उभयता बसले. तैसेच गावात जाऊन त्याच्या हवेलींत घातलें. सुभेदार माघारे आले. माधोसिंग आल्यावरी आठवे रोजीं राजश्री जायाजी सिंदेहि आले. आपण दोन तीन वेळा सुभेदारास * त्यांस विचारिलें कीं आमच्या येवजाची वाट काय ?
2.31.8
तिकडे पंतास निकड लागली आहे, वरातावर वराता होतात, आमची वाट काय ? त्याणी सांगितलें कीं हे रुपये वसूल होतील, यांतून रुपये हुंडिया करून तुम्हांस रवाना करूं. यसें उत्तर दिल्हें. आणप्रमाण केलें. वसुलास लागले. इतकियांत माधोसिंग याची फौज दाहा पंधरा हजार आली होती. सेखावन वगैर लोक जमाव जाल्यावर त्याची नजर फिरली. मग कुविद्या धरिली कीं सुभेदारास व जायाजी शिंदे यास जेवावयास करावें. अन्न अवघें विखाचें करावें. दाहा पांच हजार खासे होतील यांस जेऊं घालावें आणि मारावें यैसे केलें. यांजला बहुत प्रकारें विनंति केली. सुभेदार कबूल जाहले. जायापानी गोष्ट उडविली कीं, आपण येकंदर जात नाहीं. तुम्हीं जाल तरी जा, परंतु आपण येकंदर जाणार नाहीं. मग राहिले. त्याणे पाच सात दिवस पक्वाने केलीं होतीं. त्यांत अवघे वीख घातलें. पाण्यांत वीख घातलें आणि ब्राम्हणांस पेढे विखाचे केले. सोमळख्वार दोन मण घेतला होता. यैसा प्रसंग केला होता. ईश्वरें सरदारांस वांचविलें. जायापानें मोडा घातला. व उमेदसिंग बुंदीवाले याणें मोडा घातला मग त्याणे अन्न मातीत पुरलें. याजला खबर नाहीं. दुसरे रोजीं दुसरा विचार केला कीं, गंगाधरपंत व आणखी कारभारी बोलाऊन आणून येथें मारावें. पहिले जात असत. दोन च्यार दिवस गावांत राहात असत. याजकरितां बोलाऊं पाठविलें. दरवाज्यावरी ताकीद केली कीं, चौघांच्या पालख्या येतील, आम्हांकडे येऊं देणे, मग शहरचे दरवाजे लावणे. यैसे करार करून याजळा बोलाऊं पाठविलें. त्याजला सांगोन पाठविलें कीं आपण प्रहर दिवसांत येतों. तैसेच जायाजी सिंदे याजकडे गेले. तिकडे संध्याकाल पावेतों लागला. शहरांत लोक दाहा पांच हजारी माणूस शहर पाहावयासी व उंटें व घोडीं........ सूत द्यावयासी जात असत. ते दिवशीं जायाजी शिंदे यांजकडील खासे फार शहरांत गेले.
2.31.9
च्यार पालखियाचे सरदार बसोन गेले. याणी म्हटलें कीं तात्या आले वर्तमान रा * सांगितले. दरवाजे लाविले. माघ वद्य ९ रोजीं गुरूवासरीं राजियाचा हुकूम जाला कीं महराठे लोक अले कतल, यसें सांगोन अगोदर लोकांस विसारत होती. होतांच राजा उठोन माडीवर जाऊन बसला. शहरचे दरवाजे लावले. दोन प्रहरापासून आपलेकडील माणसें मारीत होते. तों प्रहर रात्रपर्यंत माणूस कापिलें. तीन हजार माणूस कापलें व येक हजार माणूस जखमी जाहलें. जायापाकडील मातबर मातबर सरदार नामांकित हजार व सिपाय व चाकर वगैरे सुभेदाराकडील मातबर पंचविस व चाकर वगैरे हजार दीड हजार व ब्राम्हण शंभर व बटकी व पेंढारी व मुलें यसें कापून काहडलीं. जखमी जे आले ते कितेक मरतात. सें पनास माणूस वगैरे कितेक जे गावांत वाचलें तितकें मात्र आलें. गांवकुसावरून उड्या घालून आले. त्याचे पाय मोडले व कमर मोडले. कितेक वांचोन आले. ऐसा कहर शहरांत केला. येक हजार घोडे भलभले चांगले बसोन गेले होते तितकेहि गेले. सोनियाची कडीं व मोर्त्याच्या जोड्या व पैका वस्तभाव घ्यावयास गेले. इतके माणूस गेले. सुमार नाहीं. मारले फार गेले. त्यास जायाजी शिंदे याजकडील मातबर सरदार वगैरे फार मारले गेले. आमचा उंट दाडगे याणी नेला. मल्हारबाचे उंट ६ व सिलेदाराचे पांच व आमचा येक येकूण बारा चारा आणावयासी गेले होते. ते येके दिवशीं चांगले ओझे पडले याजकरितां बुधवारीं उंट आणावयास गेलों. गांवात उंट विकत घेऊन संध्याकाळीं आलों. गुरूवारीं भोजन करून उंटाच्या सरंजामासाठीं गावात जीन ठेऊन जात होतो. त्यास ईश्वर काय बुद्धि दिली ते राहिलों. सरंजामा-साठीं आमचा बारगीर व मल्हारजी जासुद सरकारचा गेला होता. तो दोघे मारले गेले. यसें वर्तमान जाहलें. आमचें मरण; तुमचे पुण्येकडून वांचलों. मार्ग चालत नाहीं.
2.31.10
कासीद देखील वाटेने मारले जातात. यसें चौकडून रान नासलें आहे. याजकरितां तुम्हाकडे मानसे पाठवावयास अनुकूल पडलें नाहीं. गुरूवारीं पौष वद्य ९ रोजीं ऐसा विचार जाला. शनवारीं शाहरापासून कूच करून आलिकडे तीन च्यार कोस येऊन राहिले. त्याचा वकील कनीराम व गणेशमाली याचा वकील व गोविंद तिमाजी वकील माहादभटाचा, यसै गावातून आले. त्याणी कितेक प्रकारे समजाविले कीं आम्हांपासून गोष्ट जाली नाही. पोरासोरी जाहाली. जे जाहाली ते उत्तम. परंतु आतां कांहीं ते गोष्ट येत नाहीं. मारले गेले ते गेले.
2.31.11
[१ मल्हारंराव होळकर व गंगाधर तात्या चंद्रचूड यांच्या.]
2.31.12
[१ गोष्टी करणें.]
2.31.13
[२ वार चूक असावा असें वाटतें. गुरवारला नवमी आहे असे पत्रांत आलें आहे. द्वादशी रविवारीं येते.]
2.31.14
[३ होळकर.]
2.31.15
पुढं सला करावा. याणी पाहिलें तों रान भारी . . . . . खिलें इलाज उपाय चालेनासा जाहला. * जागा शहरे व गांव मातबर, जवळ येऊं देणें नाहीं. जैसे प्रसंग पादोन कबूल केलें कीं घोडीं द्यावीं. जे वस्तभाव गेली आहे त्याचा खंड घ्यावा व जे खंडणी पहिली केली * * जैसी सावकारी निशा करून देणें आणि आपण कूच करून जातों. वकिलाणी कबूल करून गावात जाऊन राजियास सांगितलें. आज उद्यां आज उद्यां करितां पंधरा दिवस जाहाले कीं आम्ही येतों, निशा करून देतों. रोज कागद येतात, परंतु त्याचा चित्तांत दगाबाजी आहे. सुधेपणें देत नाहीं. हे तो आशेस गुतले. पाहावें. आठा रोजांत काम काज उरकून कूच करून मजल दरमजल मनसूर आ लीकडे जावें. वकील येऊन बैसले आहेत, त्याजकडे जावयास उतावेल जाहाले. परंतु येथें आटकाव जाहला. याजकरितां विलाज नाहीं. पांचा साता दिवसांत तह बसला सावकारी निशा जाली. तरी लवकरच येमुनातीर प्रांतीं येतील. नाहीं तरी दोन महिने अटकाव होईल. लक्ष वाटे तह बसेल, चिंता नाहीं. पुरवी राजा मेला ते वेलेस पंचवीस तीस हती व पनास पावणसें घोडीं राजियाची आणिली आहेत. लस्करांत माहागाई तांदूल रुपयास च्यार शेर व तेल दोन सेर व तूप दीडसेर व पीठ रुपयास आठ शेर, दाणा च्यार पाईली सातू आहेत. येणेंप्रमाणें धारण आहे. रस्ता येऊं पावत नाहीं. लुटीचे दाणें येका दों दिवशीं येतात. येखादे दिवशीं येत नाहींत. जैसा प्रसंग आहे. मिरखान तुम्हाकडे आले म्हणोन सुभेदार सांगत होते. आपण लिहिलें कीं हा कालपर्यंत आले नाहीं. भगवंतानें मोठे यश सुभेदारांस दिधलें होतें. आतां अपेश आलें याजकरितां परमश्रमी आहे. देशामध्यें गडबड यैकतों. नासरजंगहि वारले. सत्यमिथ्य ठाऊक नाहीं. सुभेदाराचा कारभार वोढगस्त आहे, देऊं म्हणतात, यैवज हातास आलेवर वाट होईल. जैनगरचा यैवज आला तरी वाट सत्वर होईल. नाहीं तरी मग मनसूरअलीकडे काय होईल तें पाहावें. येथील प्रसंग या प्रकारचा आहे. यैवज (तिकडेच) देऊं म्हणतात. हातास येईल तेव्हां खरें. येथील काम काज उरकून आगरेप्रांतीं जाणार आहेत. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असों दीजे हे विज्ञापना.
2.31.16
[१ सफदरजंग.]
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English