Selections from the Peshwa Daftar 2.31.9
Selections from the Peshwa Daftar 2.31.9
- Language
- Marathi
2.31.9
च्यार पालखियाचे सरदार बसोन गेले. याणी म्हटलें कीं तात्या आले वर्तमान रा * सांगितले. दरवाजे लाविले. माघ वद्य ९ रोजीं गुरूवासरीं राजियाचा हुकूम जाला कीं महराठे लोक अले कतल, यसें सांगोन अगोदर लोकांस विसारत होती. होतांच राजा उठोन माडीवर जाऊन बसला. शहरचे दरवाजे लावले. दोन प्रहरापासून आपलेकडील माणसें मारीत होते. तों प्रहर रात्रपर्यंत माणूस कापिलें. तीन हजार माणूस कापलें व येक हजार माणूस जखमी जाहलें. जायापाकडील मातबर मातबर सरदार नामांकित हजार व सिपाय व चाकर वगैरे सुभेदाराकडील मातबर पंचविस व चाकर वगैरे हजार दीड हजार व ब्राम्हण शंभर व बटकी व पेंढारी व मुलें यसें कापून काहडलीं. जखमी जे आले ते कितेक मरतात. सें पनास माणूस वगैरे कितेक जे गावांत वाचलें तितकें मात्र आलें. गांवकुसावरून उड्या घालून आले. त्याचे पाय मोडले व कमर मोडले. कितेक वांचोन आले. ऐसा कहर शहरांत केला. येक हजार घोडे भलभले चांगले बसोन गेले होते तितकेहि गेले. सोनियाची कडीं व मोर्त्याच्या जोड्या व पैका वस्तभाव घ्यावयास गेले. इतके माणूस गेले. सुमार नाहीं. मारले फार गेले. त्यास जायाजी शिंदे याजकडील मातबर सरदार वगैरे फार मारले गेले. आमचा उंट दाडगे याणी नेला. मल्हारबाचे उंट ६ व सिलेदाराचे पांच व आमचा येक येकूण बारा चारा आणावयासी गेले होते. ते येके दिवशीं चांगले ओझे पडले याजकरितां बुधवारीं उंट आणावयास गेलों. गांवात उंट विकत घेऊन संध्याकाळीं आलों. गुरूवारीं भोजन करून उंटाच्या सरंजामासाठीं गावात जीन ठेऊन जात होतो. त्यास ईश्वर काय बुद्धि दिली ते राहिलों. सरंजामा-साठीं आमचा बारगीर व मल्हारजी जासुद सरकारचा गेला होता. तो दोघे मारले गेले. यसें वर्तमान जाहलें. आमचें मरण; तुमचे पुण्येकडून वांचलों. मार्ग चालत नाहीं.