Selections from the Peshwa Daftar 2.31.8
Selections from the Peshwa Daftar 2.31.8
- Language
- Marathi
2.31.8
तिकडे पंतास निकड लागली आहे, वरातावर वराता होतात, आमची वाट काय ? त्याणी सांगितलें कीं हे रुपये वसूल होतील, यांतून रुपये हुंडिया करून तुम्हांस रवाना करूं. यसें उत्तर दिल्हें. आणप्रमाण केलें. वसुलास लागले. इतकियांत माधोसिंग याची फौज दाहा पंधरा हजार आली होती. सेखावन वगैर लोक जमाव जाल्यावर त्याची नजर फिरली. मग कुविद्या धरिली कीं सुभेदारास व जायाजी शिंदे यास जेवावयास करावें. अन्न अवघें विखाचें करावें. दाहा पांच हजार खासे होतील यांस जेऊं घालावें आणि मारावें यैसे केलें. यांजला बहुत प्रकारें विनंति केली. सुभेदार कबूल जाहले. जायापानी गोष्ट उडविली कीं, आपण येकंदर जात नाहीं. तुम्हीं जाल तरी जा, परंतु आपण येकंदर जाणार नाहीं. मग राहिले. त्याणे पाच सात दिवस पक्वाने केलीं होतीं. त्यांत अवघे वीख घातलें. पाण्यांत वीख घातलें आणि ब्राम्हणांस पेढे विखाचे केले. सोमळख्वार दोन मण घेतला होता. यैसा प्रसंग केला होता. ईश्वरें सरदारांस वांचविलें. जायापानें मोडा घातला. व उमेदसिंग बुंदीवाले याणें मोडा घातला मग त्याणे अन्न मातीत पुरलें. याजला खबर नाहीं. दुसरे रोजीं दुसरा विचार केला कीं, गंगाधरपंत व आणखी कारभारी बोलाऊन आणून येथें मारावें. पहिले जात असत. दोन च्यार दिवस गावांत राहात असत. याजकरितां बोलाऊं पाठविलें. दरवाज्यावरी ताकीद केली कीं, चौघांच्या पालख्या येतील, आम्हांकडे येऊं देणे, मग शहरचे दरवाजे लावणे. यैसे करार करून याजळा बोलाऊं पाठविलें. त्याजला सांगोन पाठविलें कीं आपण प्रहर दिवसांत येतों. तैसेच जायाजी सिंदे याजकडे गेले. तिकडे संध्याकाल पावेतों लागला. शहरांत लोक दाहा पांच हजारी माणूस शहर पाहावयासी व उंटें व घोडीं........ सूत द्यावयासी जात असत. ते दिवशीं जायाजी शिंदे यांजकडील खासे फार शहरांत गेले.