Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.34: [5-3-1753] Jayappa Scindia to Peshwa from Shrigonda reports that he would soon proceed to the North and join Raghoba. It seems Vishwasrao was with Jayappa.

Selections from the Peshwa Daftar 2.34

Language
Marathi

2.34

श्री.

श्रीमंत राजश्री......पंत प्रधान

स्वामीचे सेवेसी.

विनंती सेवक जयाजी सिंदे, कृतानेक विज्ञापना. सेवकाचें वर्तमान तागायत छ २९ रबिलाकरपर्यंत यथास्थित असे विशेष. आज्ञापत्र पाठविलें तें सादर जाहालें. तुम्हीं पुण्याहून चांभारगोंद्यास गेला. तेथें किती दिवस राहून मालव्यांत जाणार तें लिहिणें. फौजेची समजाविस करून सत्वर जाणें म्हणोन आज्ञा, तर फौजेची समजाविस होत आहे. बहुतकरून जाली. राहिलेले लोक त्याची समजाविस करून फाल्गुन वद्य ५ पंचमीस कूच करून हिंदुस्थान प्रांतीं जातो. आथःपर घरीं बहुत दिवस राहत नाहीं. राणाजीकडून प्राप्त फार थोडी आहे. जाताना गरमनरम होऊन पाचालाखाचा पटा घ्यावा, हें चित्तामधेंच राहिला आहे. त्याचा निमे मुलूक झर (जर ?) कोण घ्यावे म्हणोन आज्ञा तर दोही गोष्टीचें पारपत्य करावयाचें अगाध काय आहे ? आजतागायत कोणाच्या अश्रयानें राहिलें आहेत हें सर्व आपण जाणतच आहेत. उभयेताचें पारपत्य चित्तापासून करणेंच आहे तर आज्ञा करावी. जें होणें तें स्वामीच्या प्रतापेंकरून होऊन येईल. श्रीमंत राजश्री दादासाहेबास उचित मनसबा दिसेल ते लिहित जाणें म्हणोन आज्ञा केली तर आम्ही हिंदुस्थान प्रांतीं गेल्यावर तिकडे जैसा मनसबा अढळेल तैसा त्यास लेहून पाठऊं. आपण त्यास लेहून पाठवावें कीं, तुम्हांस विनंतिपत्र लेहून पाठवितील तें कार्य चितावर धरून करणें म्हणजे सर्वहि गोष्टी होऊन येतील. आम्हास जसी श्रीमंत राजश्री दादासाहेब आज्ञा करितील त्या प्रमाणेंच वर्तणूक करूं. येविसीं येक दोन वेळ त्यास लेहून पाठवावें. शाहाबादेचेविसीं लिहिलें तर शह पडल्यास काम करून घेऊं इकडील वर्तमान श्रीमंत राजश्री रावसाहेबीं लिहिलें आहे, त्यावरून श्रुत होईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

[१ विश्वासराव.]

Ca 51-8