Selections from the Peshwa Daftar 2.35: [3-10-1753] This letter, all in Raghunathrao's hand, addressed to the Peshwa from Northern India, discloses the differences that were arising between the Scindia and the Holkar.
Selections from the Peshwa Daftar 2.35
- Language
- Marathi
2.35
पौ छ ४ सफर
**श्रीशंकर.**
सेवेसी विज्ञापना. येथील मजकूर तरी राजश्री खंडेराव होळकर व सखारामपंत व गंगोबा यास सडे सात हजार फौजेनसी रवाना केले. येथे फौज नव्हती. परंतु काम तोडी आले. यास्तव आम्हाजवळ व मल्हारबाजवळ पाचसे फौज ठेऊन बाकी रवाना केले. तेथे येकादोहो रोजानी सलुख होणार होता. परंतु आमची आल्याची खबर कललियावरी राहिला. दत्ताजी सिंदे याजवल दाहा हजार फौज होती. परंतु ते न आले. जयापाची वाट पाहात राहिले. जयापा तरी मागे राहिले. याणी तरी मूलपण केले. आम्ही फजीत पडावे या आशयाने दतबा राहिले नाहीं. परंतु मूलपण जाहाले. असो. आमची फौज तरी येता दिसतच नाहीं. असा मजकूर आहे. परंतु येथे आम्ही कांहीं रांगडे वगैरे राऊत मिळतील ते ठेऊन चालवीतच आहो. राजश्री मल्हारजी होळकर याजकडून रामसिंगाविसी दत्ताजी सिंदे याजकडील राणोजी भोइटे आणून त्याची खातरजमा केली कीं हे काम खामखा करू. तथापि ते न आले. याजमुळे मल्हारबा आमलसे खंटे आहेत. सहजामध्ये बोलले कीं कामाचे वेलेस आले नाहींत हे त्यास उचित नाहीं. त्यावर आम्ही बोललो कीं दतबा मूल आहे. जयापा आल्यावरी लौकर येतील. ऐसे आहे. राा छ ७ मोहरम. बहुत काये लिहिणे हे विनंति.