Selections from the Peshwa Daftar 2.36: [1753 or 1754] Antaji Mankeshwar's letter to Sakharam Bapu requesting to arrange about his allowances.
Selections from the Peshwa Daftar 2.36
- Language
- Marathi
2.36
**श्री.**
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री सखारामपंत बापु स्वामी शेवेसी.
पोष्यें अंताजी मणकेश्वर साष्टांग नमस्कार विनंती. उपरी येथील कुशल ताा कार्तिक वद्य पंचमी मुक्काम इंद्रप्रस्थ जाणुन स्वकीयें कुशललेखन करीत गेले पाहिजे विशेष. स्वामीचीं पत्रें येक दोन पावली. साकल्य अर्थ ध्यानास आला. त्यास येथील साद्यंत अर्थ श्रीमंत राजश्री दादासाहेबांचे पत्रीं लिहिला. याजकरितां निराळा तपसील न लिहिला. तेच पत्रें वाचताच सर्व अर्थ ध्यानास येईल. गुदस्तापासून श्रीमंत राजश्री पतप्रधान यानी दाहावेळा लिहित गेले कीं, तुम्ही सर्व गोष्टीची माहितगिरी करणें. पुढें तेथील बंदोबस्त तुमच्या हाते करणे आहे. * * * * * * * * * * * म्ह्नादी मिलत नाही. लोक तर कां सोडतील; परंतु आम्ही कर्जे कोठवरी घ्यावी. सरदारीच बुडवावी यैसा प्रसंग वकिलानी केला आहे. राजश्री नारोपंत मजुमदार यांस कार्तीक शुध येकदसी देवाज्ञा जाली. तेजदार तरवारेचे होते. मोठी आमची बाजू गेली. वीसदा तरवार त्यानी येंदा मारिली. ईश्वरे मोठे वाईट केले. मजुमदारासारखा माणूस आता कोठून मिलल. या उपरी आपणाखेरीज आमचे कोण आहे ? तरी वरातेच्या मुबदला वरात अंतरवेदीत गोविंदपंतावरी देवावी. व अर्बाची नेमणूक नेमणूक नालबंदी रोजमुरियाची कोठे देवावी ते देवणे. विनंति उदास न करावी. साद्यंत वृत काडीने काडी सविस्तर लिहिणे. आपण कोठे आहेत पुढे काये कर्तव्ये हे वरचेवरी लिहित जावे. वकिलास नित्य पत्रे यावी, आम्हास न जावी, यैसी चाकरी केली नव्हती. बहुत काय लिहिणे. कृपा असो दीजे हे.
[१. नाखुष.]